नवी दिल्लीः एम.जे.अकबर यांच्यानंतर ज्येष्ठ पत्रकार विनोद दुवा यांच्यावरही लैगिक शोषनाचे आरोप करण्यात आले आहेत.निष्ठा जैन या महिला पत्रकाराने त्यांच्यावर आरोप केले आहेत.1989 मध्ये जनवाणी वाहिनीत मी मुलाखतीसाठी गेले असता त्यांनी अश्लील विनोद करायला सुरूवात केली.ते मला न आवडल्याची नाराजी माझ्या चेहर्यावर झळकत होती.त्यानंतर त्यानी मला पगाराची अपेक्षा विचारली.मी 5000 रूपये सांगितल्यानंतर तुझी लायकी आहे काय असा प्रश्न त्यानी विचारून मला अवमानित केलं.त्यानंतर मी अन्यत्र नोकरी सुरू केली.मात्र तेथेही त्यांनी माझा पिच्छा पुरविला आणि एकदा गाडीत घालून माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.मी कसाबसा तेथून पळ काढला.असा निष्ठा जैन यांनी म्हटलंय.त्यामुळं अकबर यांच्यानंतर माध्यमातील आणखी एक नाव अडचणीत आलं आहे.
विनोद दुवा यांनी अनेक नामांकित वाहिन्यांवर काम केलेले आहे.त्यासोबतच सूत्रसंचालक,राजकीय विश्लेषक,आणि निवडणूक विश्लेषक म्हणूनही त्यांची कारकीर्द गाजली आहे.2008 मध्ये त्यांना पत्रकारितेतील उल्लेखनिय कामगिरीबद्दल पद्मश्री पुरस्कारानं भारत सरकारनं सन्मानित केलं होतं.