DNA बंद

0
1451

प्रिन्ट DNA बंद, डिजिटल आवृत्ती सुरू

मुंबई : वाढता खर्च आणि घटत्या जाहिरातींमुळे प्रिन्ट मिडिया शेवटचे आचके देताना दिसत आहे. जगातील अनेक नियतकालिके बंद पडली आहेत किंवा पडत आहेत. त्यांची जागा डिजिटल मिडिया झपाट्याने घेत आहे.. हे लोन भारतातही आले असून इकडेही प्रिन्ट मिडियाला घरघर लागल्याचे दिसते आहे.. मोठ्या दैनिकांनी आपल्या तोट्यात चालणारया आवृत्त्या बंद केल्या असून पृष्ठ संख्या देखील कमी केली आहे.. डीएनए या इंग्रजी वृत्तपत्राने अगोदर पुण्याची आवृत्ती बंद केली.. आता अहमदाबाद आणि मुंबई आवृत्त्या बंद होत आहेत.. DNA ने आज 10 ऑक्टोबरपासून मुद्रित अंक बंद करण्यात येत असल्याची नोटीस पहिल्या पानावर छापली आहे.. DNAआता डिजिटल होत असल्याचे नोटिशीत म्हटले आहे.. तरूण वाचक आणि नव्या पिढीची गरज लक्षात घेऊन हा बदल केला जात असल्याचे DNA ने म्हटले आहे.. मात्र staffचे काय करणार यावर नोटिसीत भाष्य केलेले नाही.. डिजिटलसाठी फारच थोडा staff लागतो.. त्यामुळे आज नसले तरी DNA क़मशा:staff कमी करणार यात शंका नाही.. होणारे बदल लक्षात घेऊन छोटया वृत्तपत्रांनी आपल्या डिजिटल आवृत्त्या तातडीने सुरू कराव्यात असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे एस.एम.देशमुख यांनी केले आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here