पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने पत्रकार हल्ला कायदा,पत्रकार पेन्शन योजना तसेच पत्रकारांच्या अन्य प्रलंबित मागण्यांसाठी येत्या 17 फेबुवारी रोजी राज्यातील सर्व डीआयओ कार्यालयांना घेराव घालण्यात येणार आहे.या आंदोलनास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा पाठिंबा मिळावा यासाठी 5 फेबु्रवारी राजी राळेगणसिद्दी येथे अण्णा हजारे यांची भेट घेण्याचं ठरलं आहे.किरण नाईक,तसेच समितीचे काही आणि नगर जिल्हयातील समितीचे सदस्य बरोबर असणार आहेत.