Saturday, December 21, 2024
Home Blog Page 375

उद्याचा बातमीदारचा आज वर्धापन दिन

0

3 वर्षे, 1036 पोस्ट आणि 25,008 व्हिजिटर्स. हा लेखाजोखा आहे माझ्या ब्लॉगचा.महाराष्ट्रात पत्रकारांवर हल्ले वाढले होते.पत्रकार रोज अनेक प्रश्नांशी झगडत होते.ज्याच्या हातात माध्यमं आहेत,जी मंडळी जगभराचे प्रश्न मांडत होती,त्यांचे आपल्याच प्रश्नांकडं दुर्लक्ष होत होतं.पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्याही बातम्या येत नव्हत्या आणि आपले प्रश्न मांडायलाही पत्रकारांना लाज वाटत होती.पत्रकारांचे प्रश्न माध्यमातून मांडलेच जात नसल्यानं पत्रकारांचेही काही प्रश्न असू शकतात किंवा आहेत  हे समाजाला माहितच होत नव्हतं.राज्यात अनेक ठिकाणी पत्रकारांवर हल्ले व्हायचे त्याच्या बातम्या येत नसल्यानं कुठे हल्ला झाला,कोणी केला,त्याचं कारण काय हे ही ज गाला  कळायचं नाही.त्यातून मग पत्रकारांबद्दलच अनेक समज गैरसमज पसरायचे.ज्याच्यावर वेळ आली तो बिचारा पत्रकार व्यक्तिगत पातळीवर एकाकी लढत राहायचा.े.ही सारी परिस्थिती पाहून मन अस्वस्थ व्हायचे.मी तीस वर्षेपत्रकारितेत आहे.एका खेड्यातील वार्ताहरापासून ते संपादकांपर्यतच्या सर्व पातळ्यावर मी काम केलेले आहे.त्यातील 23 वर्षे मी संपादक राहिलो आहे.त्यामुळं पत्रकारांचे प्रश्न ,त्याच्या समस्यांशी मी चांगला परिचिच आहेे . अनेकदा मी ही त्यातून गेलो आहे. छत्रकारितेतील भ्रम आणि वास्तव हे ही मला चांगल्या प्रकारे माहित असल्यानं पत्रकारांचे प्रश्न घेऊनच आपण लढायचे असं मी ठरविलं आणि त्याचा एक भाग म्हणून 26- 02-2014 रोजी मी ( smdeshmukh.blogspot.in ) हा ब्लॉग सुरू केला.पत्रकारावरील हल्ले आणि पत्रकारांचे प्रश्न धाडसानं मांडण्याचा यापूर्वी असा प्रयत्न झालेला नव्हता.पत्रकारांना तत्वाचे डोस पाजणारे काही ब्लॉग होते (आणिआहेत)  पण हे ब्लॉगर पत्रकारांच्या प्रश्नांबद्दल कधी बोलताना दिसले नाहीत.त्या अंगाने असा प्रयत्न प्रथमच होत होता.माझ्या या प़्रयत्नाला चांगला प्रतिसाद मिळाला.राज्यातील पत्रकारांनी आणि जगभरातील वाचकांनी ब्लॉगचं चांगलं स्वागत केलं.त्याची संख्या आज 25हजारचा आकडा पार करून गेली आहे.पत्रकारांनी ,वाचकांनी दाखविलेल्या या विश्वासाबद्दल त्यांचे कोणत्या शब्दात आभार मानावेत तेच कळत नाही.
ब्लॉग सुरू केला होता पण ब्लॉगच्या मर्यादाही जाणवत होत्या.त्यामुळं एखादी वेबसाईट असावी असा विचार समोर आला.उद्याचा बातमीदार नावाच्या एका साप्ताहिकाचं रजिस्ट्रशन माझी पत्नी शोभना हिनं केलेलं होतं.त्याच नावाचा मुद्रित अंक आणि वेबसाईटही सुरू करावी अशी कल्पना समोर आली आणि दोन्ही गोष्टी सुरू केल्या.उद्याचा बातमीदारला आज बरोबर एक वर्षेपूर्ण होत आहे.7 फेबु्रवारी माझा मुलगा सुधांशूचा वाढदिवस ्‌ असतो त्याच दिवशी गेल्या वर्षी वेबसाईट लॉच केली.एक वर्षेचालविल्यानंतर आज तिचा लुक बदलत नव्या रंगात नव्या ढंगात उद्याचा बातमीदार ( वेबसाईटचा पत्ताही बदलला आहे,तो कृपया वाचकांनी लक्षात ठेवावा तो असा www.batmidar.inअसा आहे ) लोकांसमोर येत आहे.लूक बदलला,आणि पत्ताही बदलला असला तरी बाणा मात्र कायम आहे.पत्रकारांचे प्रश्न बातमीदार त्याच धडाडीनं  त्याच धाडसाने आणि  कोणालाही भीक न घालता किंवा कोणासमोर लाचार न होता यापुढंही मांडत राहणार आहे.
मुद्रित स्वरूपातील साप्ताहिक जवळपास सहा महिने चालविले.पत्रकारांचे प्रश्न घेऊनच हे साप्ताहिक सुरू होते तरी आर्थिक काऱणांनी ते चालवता आलं नाही.आता ते बंद पडले आहे.मुंबईत बसून अनेकजण साप्ताह्किवाल्यांना लंगोटी पेपर किंवा चिटोरी पेपर म्हणून हिणवत असतात पण साप्ताहिक काढणं आणि ते चालवणं किती अवघड आङे याचा मी अनुभव घेतला आहे.
आज साप्ताहिक बंद असले तरी बातमीदार ही वेबसाईट आणि माझा ब्लॉग सुरू आहे.महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आणि जगात पत्रकारितेच्या क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडीची माहिती देण्याचे तसेच महाराष्ट्रात  पत्रकाारांवर होणाऱ्या  अन्यायाच्या विरोधात आवाज उठविण्याचं काम माझ्या हातातील ही दोन्ही माध्यमं करीत आहेत.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती किंवा मराठी पत्रकार परिषदच्या बातम्याचं व्यासपीठ म्हणूनच आज महाराष्ट्रत उद्याचा बातमीदारकडं पाहिलं जातं.दररोज शेकडो पत्रकार उद्याचा बातमीदारला भेट देत असतात.पत्रकारांमधील दोषांपेक्षा पत्रकारांच्या गुणांची कदर करणारा आणि पत्रकारांबद्दल समाजात सकारात्मक दृष्टीकोन निर्माण व्हावा हा बातमीदारचा उद्देश आहे.पत्रकारांनीच आपल्या मित्रांचे कपडे काढून त्याला नागडे करावे आणि समाजातही त्यामुळं पत्रकारांबद्दल नकारात्मक दृष्टीकोन तयार व्हावा असा उद्योग बातमीदार करीत नाही ,करणार नाही.
उद्याचा बातमीदार असेल किंवा ब्लॉग असेल हे चालविणे म्हणजे लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याचा उद्योग .यातून दोन पैश्यांचाही लाभ नाही तरीही आपण जो पत्रकारितेचा धर्म गेली तीस वर्षे पाळला,जे भोग आपल्या वाट्याला आले ते भोग

छत्रकारितेत येणाऱ्या तरूण पत्रकारांच्या वाट्याला येता कामा नयेत आणि पत्रकारांचेही काही प्रश्न आहेत आणि त्याकडे शासनाने आणि समाजानंही सहाऩुभूतीनं पाहिलं पाहिजे असं आम्हाला वाटत असल्यानंच या लष्कराच्या भाकऱ्या आनंदानं भाजण्याचं काम आम्ही करीत आहोत.अपेक्षा एकच आहे,याकार्यात आपल्या सर्वांची मदत मला अपेक्षित आहे.महिन्यातून दोन बातम्या जरी पत्रकारांनी पत्रकारांबद्लच्या छापल्या किंवा एक दिवस जरी पत्रकार संघटनेच्या कामासाठी दिली तरी मी जे काम एक मिशन म्हणून हाती घेतले आहे ते यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही.कृपया मला,उद्यााचा बातमीदार आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीला आपली साथ असू द्यावी एवढीच विनंती आणि अपेक्षा .

नवी मुंबईत पत्रकारावर हल्ला

0

महाराष्ट्रात पत्रकारांवर होणारे हल्ले थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीत.नवी मुंबई मधील येथील एका स्थानिक वाहिनीचे पत्रकार सागर शेरे यांच्यावर नुकताच प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.त्यांच्या हाताला मार लागला असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती या घटनेचा तीव्र शब्दात धिक्कार करीत आहे.

मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न तालुका अध्यक्षांचा लवकरच मेळावा

0

मराठी पत्रकार परिषदेची महत्वाची राज्यस्तरीय बैठक उद्या शनिवारी पुण्यात होत असल्याची माहिती परिषदेचे सरचिटणीस संतोष पवार यांनी दिली आहे.बैठकीच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे अध्यक्ष किरण नाईक असणार असून पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांचे यावेळी विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.बैठकीस परिषदेशी संलग्न असलेल्या सर्व जिल्हा अध्यक्षांनी तसेच परिषद प्रतिनिधींनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्याध्यक्ष चंद्रशेखर बेहेरे यांनी केले आहे.बैठक पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात होणार आहे.दुपारी 11 वाजता ही बैठक सुरू होणार आहे.
बैठकीत संघटनात्मक बाबी,तसेच घटनादुरूस्तीच्या विषयावर चर्चा होणार आहे.शिवाय या बैठकीत परिषदेचे पदाधिकारी नेमण्याबाबतही चर्चा होणार आहे.परिषदेशी सध्या राज्यातील 320 तालुका पत्रकार संघ जोडले गेलेले आहेत .मात्र या तालुकासंघांशी परिषदेचा थेट असा कोणताही संपर्क नसल्याने अनेक तालुका संघांना परिषदेच्या दररोजच्या कामकाजाची कल्पनाच नसते.त्यामुळे भविष्यात तालुका संघांशी थेट संपर्क जोडण्याची परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची कल्पना असून त्याची पूर्व तयारी म्हणून परिषदेच्या तालुका अध्यक्षांचा एक मेळावा मार्चमध्ये घेतला जाणार आहे त्यावर देखील चर्चा होणार आहे.
पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीमध्ये मराठी पत्रकार परिषद ही महत्वाची भूमिका बजावत आहे.पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने 17 फेब्रुवारी रोजी राज्यातील डीआयओ कार्यालयांना घेराव घालण्याचे आंदोलन करण्याचे ठरवले आहे.हे आंदोलन यशस्वी करण्यासाठीची आवश्यक ती तयारी देखील बैठकीत कऱण्यात येणार आहे.

कर्जत नगराध्यक्षपदासाठी 17 तारखेला निवडणूक

0

कर्जत नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक येत्या 17 फेब्रुवारी रोजी होणार आहे.रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.कर्जत नगरपालिकेचे नगराध्यक्षपद अडीच वर्षांसाठी खुल्या प्रवर्गासाठी असल्याने या पदावर कोणाची वर्णी लागते याकडे रायगडचे लक्ष लागले आहे.
नुकत्याच झालेल्या कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला दहा तर शिवसेनेला आठ जागा मिळाल्या असल्याने नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार आहे.
नगराध्यक्षाच्या निवडीनंतर लगेचच उपाध्यक्षांची निवडणूक होईल अशी माहिती कर्जत नगरपालिकेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांनी दिली.

पेणमध्ये अन्न सुरक्षा योजनेचा शुभारंभ

0

दार्रिद्‌÷य आणि उपासमार दूर करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अन्न सुरक्षा योजनेचा शुभारंभ काल पेण तालुक्यातील वाक्रुळ येथे आमदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी पाटील यांच्या हस्ते काही आदिवासींना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
पेण तालुक्यात 101 रास्त धान्य दुकानं असून शहरी भागात 16 हजार 542 तर ग्रामीण भागात 49 हजार 64 लाभार्थी आहेत.या सर्वांना सदरच्या योजनेचा लाभ होणार आहे.या योजनेअंतर्गत प्रती माणसी 2 रूपये किलो गहू,3 रूपये किलो तांदूळ,1 रूपया किलो बाजरी,ज्वारी देण्यात येणार आहे.
पेणच्या रास्त भाव दुकानदारांनी ही योजना गरिबांपर्यत पोहचवावी असे आवाहन याप्रसंगी आमदार धैर्यशील पाटील यांनी केले.या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जनजागृतीची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पत्रकारांच्या आंदोलनास अण्णा हजारे यांचा पाठिंबा

0

 राळेगणशिंदी दिनांक 5 ( प्रतिनिधी) समाजासाठी काम करणाऱ्या पत्रकारांना कायद्याने संरक्षण मिळालेच पाहिजे,सरकारने तातडीने तसा कायदा केला पाहिजे  अशी आग्रही मागणी करीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 17 फेब्रुवारीच्या डीआयओ कार्यालयांना घेराव घालण्याच्या पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या आंदोलनास आपला पाठिंबा जाहीर केला.

पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या एका शिष्टमंडळाने आज राळेगणशिंदी येथे जाऊन अण्णा हजारे यांच्याशी अ र्धा तास र्चाा केली.गेल्या वर्षात महाराष्ट्रात 73 पत्रकारांवर हल्ले झाले,दोन पत्रकारांचे खून झाले,एका महिला पत्रकारावर अत्याचार झाले,आणि माध्मयांच्या पाच कार्यालयावर हल्ले केले गेल्याची माहिती अण्णांना सांगितल्यानंतर अण्णा संतप्त झाले. ङ्गकाय चाललंय हे ङ्ग ? असा सवाल करून लोकहिचाचे कायदे न करणाऱ्या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही अशी भावना व्यक्त केली.आरटीआय चे कार्यकर्ते असोत किंवा समाजासाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते किंवा पत्रकार असोत यांना कायद्याचं सरक्षण असलंच पाहिजे आणि या संबंधीचा कायदा केवळ राज्यानेच नव्हे तर केंद्रानेही करायला हवा अशी मागणी त्यांनी केली.गेली काही वर्षे पत्रकार कायद्याची मागणी करीत आहेत पण ती मागणी पूर्ण केली जात  नाही याचे कारण हा कायदा कोणत्याच राजकीय पक्षाला नको आहे कारण त्यामागे राजकीय पक्षांचे हितसंबंध असल्याचे अण्णा हाजारे यानी स्पष्ट केले.

पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा करावा अशी मागणी करणारे एक पत्र आपण यापुर्वीच राज्य सरकारला पाठविले होते आणि पत्रकारांच्या या लढ्यास पाठिंबाही दिला होता अशी माहिती देत कायद्याच्या मागणीसाठी पत्रकारांना रस्त्यावर उ तरावे लागते ही बाब चांगली नाही असे मतही त्यांनी व्यक्त केले.अण्णा हजारे यांना आज भेटण्यास गेलेल्या शिष्टमंडळात समितीचे समन्वयक त था मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष  किरण नाईक,पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद पाबळे,उपाध्यक्ष सुनील वाळुंज,संतोष खेडेकर यांच्यासह नगर,पुणे येथील पत्रकार उपस्थित होते.

२०१३ मधील पत्रकारांवरील हल्ले

0

11 महिन्यात महाराष्ट्रात 2 पत्रकारांचे खून,
एका महिला पत्रकारावर सामुहिक बलात्कार,
65 पत्रकारांवर जीवघेणे हल्ले,
अनेकांवर खंडणी,ऍट्रॉसिटी,दरोड्‌याचे खोटे गुन्हे दाखल
[divide style=”3″]

म हाराष्ट्रत पत्रकारांवर अखंडपणे हल्ले सुरू आहेत.पत्रकार संरक्षण कायदा कऱण्याच्या मागणीक़डं सरकार करीत असलेलं अक्षम्य दुर्लक्ष आणि विद्यमान कायद्याचा गुंडांना धाक उरला नसल्याने पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये चिंतावाटावी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.2013 च्या जानेवारी ते नोव्हेबर या अकरा महिन्यात राज्यात दोन पत्रकांराचे खून झाले ( नरेंद्र दाभोळकर आणि  जळगाव येथील नरेश सोनार ) एका महिला पत्रकारावर सामुहिक बलात्कार केला गेला आणि 65 पत्रकारांवर हल्ले झाले, ( यातील काही हल्ल्यात चाकू सारख्या तिक्ष्ण हत्यारांचा वापर केला गेला) पुर्णा येथील पत्रकार दि नेश चौधरी यांच्या साऱ्या कुटुंबावरच ऍॅसिड टाकून त्याला आयुष्यातून उठविण्याचा प्रयत्न केला गेला.हदगाव येथील पत्रकार शिवाजी देशमुख यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांच्यावरच दरोडा,ऍटॉसिटीचा गुन्हा दाखल केला गेला.त्यासाठी पोलिसांवर राजकीय दबाब आणला गेला.इतर प्रकरणातही  केवळ बातमी दिल्यामुळेच हल्ले झाले आहेत.या विरोधात पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने बीड,परभणीत भव्य मोर्चे काढले गेले.8 मे रोजी पनवेल ते मुंबई अशी मोटार रॅली काढली गेली,16 नोव्हेंबर हा राष्ट्रीय पत्रकार दिन काळा दिवस म्हणून पाळला.जेथे जेथे पत्रकारांवर हल्ले झाले अशा काही ठिकाणी समितीच्या सदस्यांनी जाऊन संबंधित पत्रकारांची भेट घेतली तसेच त्याना मद तही केली.    ———————-   म ाहिती संकलन—एस.एम.देशमुख
——————————————————————————————————————————————————-

2 जानेवारी 13- परभणी जिल्ह्यातील सेलू येथील पत्रकार दिलीप डासाळकर यांच्यावर हल्ला

3 जानेवारी 13 – बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील एका पत्रकाराला बातमी दिल्याब्ददल तहसिलदाराची ताकिद

8 जानेवारी 13- उस्मानाबाद येथील पत्रकार शिवप्रसाद बियाणी यांच्यावर पोलिसाचा हल्ला

9 जानेवारी 13- आौरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरचे पत्रकार जमील पठाण यांना जिवे मारण्याची धमकी

11 जानेवारी13 – कन्नड तालुक्यीतील शिवणा-टाकळी प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी गेलेल्या दोधांना डांबले

13 जानेवारी 13-उस्मानाबाद जिल्ह्यातील शिरढोणचे पत्रार जगदीशचंद्र जोशी यांना गुंडांकडून मारहाण

13 जानेवारी13-नाशिक येथील एका हिंदी दैनिकाच्या पत्रकारास शिवसैनिकांकडून मारहाण

16जानेवारी 13 – पत्रकार हेमंत देसाई यांनी सकाळमध्ये लिहिलेल्या लेख प्रकरणी आर.एस.एसच्या धमक्या

16 जानेवारी 13- पेण तालुक्यातील वडखळ येथील पत्रकार विजय मोकल यांना रवी पाटील यांच्याकडून धमक्या

8 फेब्रुवारी 13-  बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील पत्रकार बळीराम बाजीराव राऊत याच्यावर हल्ला.

10 फेब्रुवारी 13- नांदेड येथील गावकरीच्या कार्यालयावर शिवसैनिकांचा हल्ला.

4 मार्च 13      – सातारा येथील पत्रकार विशाल कदम यांना आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण
5 मार्च 13-     – सातारा येथे भोजपूरी चित्रपट कलावंतांची सहा पत्रकारांना मारहाण.कोंडून ठेवले

12 मार्च 13 – पूर्णा येथील पत्रकार दि नेश चौधरीवर अ्रसिड हल्ला,हल्लेखोर कॉग्रेसचा पुढारी

13 मार्च 13- गंगाखेड येथील पत्रकार गंगाधर कांबळे यांच्यावर हल्ला

14 मार्च 13 – उमापूर येथील पत्रकार कृष्णा देशमुख यांच्यावर हल्ला

19 मार्च 13- नवी मुंबईत आसाराम बापूंच्या समर्थकांची पत्रकारांवर तुफान दगडफेक.सहा पत्रकार जखमी

21 मार्च 13- निखिल वागळे आणि राजीव खांडेकर यांच्यावर हक्कभंग ठराव दाखल

27 मार्च 13- टीव्ही-9चे छायाचित्रकार चरण मरगम यांना मुंबईत मारहाण

28 मार्च 13- सातारा येथील पत्रकार रोहित बुधकर यांच्यावर हल्ला

29मार्च 13- राणी सावरगाव येथील राहूल बनाटे आणि संजय राबोले यांच्याविरोधात खोटी तक्रार

30मार्च 13-एबीव्हीपीच्या आंदोलनादरम्यान नागपूर विद्यापीठात कर्मचाऱ्यांची पत्रकारांना धक्काबुक्की

31मार्च 13- ताडकळस येथील पत्रकार त्र्यंबक खंदारे यांना संरपंचाची मारहाण

1 एप्रिल 13 – सातारा येथील पत्रकार पियूष भूतकर आणि महेश पवार यांना पोलिसांची दमदाटी

2एप्रिल  13 -वर्धा येथील पत्रकार रूपेश खैरी आणि प्रशांत वेलांडी याना पोलिसांकडून धमक्या

2 एप्रिल 13- मुंबई येथील प्रहारचे फोटोग्राफर विनम्र आचरेकर यांना सुरक्षा रक्षकांची मारहाण

4 एप्रिल 13- पारनेर येथील सकाळचे बातमीदार अनिल चौधरी यांच्यावर उपसंरपंचाकडून हल्ला.

6एप्रिल  13- न्यूज नेशनच्या सोनू कनोजिया आणि इम्रान या दोघांना निलंबित उपायुक्तांची मारहाण

13 एपिॅल13- बीड येथील पत्रकार सतीश शिंदे यांना शिरूर तालुक्यातील गोतळवाडा येथे मारहाण

16एप्रिल 13- नेवासा फाटा येथील पत्रकार बाळासाहेब देवखिडे यांना एपीआयकडून मारहाण

25 एप्रिल 13- विटा येथील पत्रकार विजय लोळे आणि सतीश भिंगे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल

1 मे      13-सोनपेठ येथील पत्रकार सुधीर बिदू यांच्यावर हल्ला

3 ंमे       13 – झी न्यूजचे लातूर येथील प्रतिनिधी शशिकांत पाटील यांना राज ठाकरे यांच्या अंगरक्षकाची धक्काबुक्की.ठाकरेकडूनही दम

7 मे        13 गंगाखेड येथील पत्रकार संजीव सुपेकर यांच्यावर हल्ला.दोन्ही पाय फॅॅक्चर

9 मे        13 सोनपेठ येथील पत्रकार सय्यद कादिर,भागवत पोपडे,कृष्णा पिंगळे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल.
22जून      13 इचलकरंजी येथील ज्येष्ठ पत्रकार बाळ मकवाना यांच्या घरावर आवाडे कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांचा हल्ला. ब ातमीचा राग

26 जून     13 माजलगाव तालुक्यातील तालखेड येथील झुंजार नेताचे वार्ताहर अरविंद वाव्हळ यांच्यावर हल्ला.

28 जून     13 आयबीएन- लोकमतचे औरंगाबाद ब्युरो चीफ सिध्दार्थ गोदाम आणि फोटोग्राफर सुधीर जाधव यांना धक्काबुक्की.

3 जुलै  13 – नक्षर जिल्हयातील कर्जत येथील काही पत्रकारांना तेथील पी आय़ची बघून घेतो अशी धमकी.

27 जुलै  13- संगमनेर येथील युवा पत्रकार अंकुश बुब यांच्यावर जीवघेणा हल्ला.

28 जुलै 13 – पुर्णा येथील सांजवार्ताचे वार्ताहर अनिल अहिरे यांच्यावर अगोदरच्या ऍशिड हल्ला प्रकरणातील गुंड अ़निल कुरकुरे याच्याकडून हल्ला.

20 ऑगस्ट 13- साधनाचे संपादक नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यात गोळ्या छाडून हत्या.तीन महिन्यानंतरही मारेकरी सापडलेच नाहीत.

31 ऑगस्ट 13- नगरचे आमदार अनिल राठोड यांच्या मुलाचा देशदूत कार्यालयासमोर धुडगूस.वीज बिल थकबाकीची बातमी दिल्याने राग.

31 ऑगस्ट 13- मंगळवेढा तालुक्यातील दहिवड येथील पत्रकार प्रमोद बनसोडे यांना वाळू माफियाची त्यांच्या घरात घुसून मारहाण.शिविगाळ.

4 सप्टेंबर   13- आसाराम समर्थकांची पुण्यात टीव्ही-9 चे सचिन जाधव आणि छायाचित्रकार अभिजित पिसे यांना मारहाण

4 सप्टेंबर   13 परभणी येथील शेतकरी आंदोलनाचे चित्रिकरण करताना पीएसआय प्रकाश बांद्रे यांची दिलीप बनकर यांना मारहाण

6 सप्टेंबर    13- जयमहाराष्ट्र चे विलास बढे यांना एका पार्टीचे चित्रिकऱण करताना मारहाण.सुरक्षा रक्षकाचे कृत्य.

16 सप्टेंबर 13- गेवराई तालुक्यातील तलवडा येथील ओमप्रकाश सखाराम कांबिलकर यांना रेती तष्कराची मारहाण.ओमप्रकाश हिदू जागृतीचे वार्ताहर

21 सप्टेंबर  13- नेवासा येथील नवाकाळ,देशदूतचे वार्ताहर राजेंद्र वाघमारे यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी.गुन्हा दाखल.

1ऑक्टोबर 13- जय महाराष्ट्र चॅनलचे विलास बढे यांच्यावर जातपंचायतीच्या लोकांचा हल्ला.बढे यांना दोन तास घरात डांबले.

1 ऑक्टोबर 13- नक्षर जिल्हयातील श्रीगोंदा येथे पत्रकार धनंजय कानगुडे यांच्यावर हल्ला.धर्माची चिकित्सा करणाऱ्या बातम्या छापल्या म्हणून हल्ला.

2 ऑकटोबर 13- मुख्यमंत्र्याच्या अंगरक्षकाकडून टीव्ही-9 चे रामराजे शिंदे आणि सागर कुळकर्णी यांना मारहाण,धक्काबुक्की.

5 ऑकटोबर 13- आळंदी येथील पत्रकार विलास काटे यांना राष्ट्रवादीच्या स्थानिक पुढाऱ्याकडून जीवे मारण्याच्या धमक्या. काटे सकाळचे वार्ताहर.

7 ऑकटोबर 13 -चंद्रपूर येथे पत्रकाराच्या विरोधात चौकाचौकात पोस्टरबाजी, पत्रकाराचा कुत्रे असा उल्लेख.

8 ऑक्टोबर 13- आदित्य पंचोलीची झी न्यूजच्या महिला पत्रकाराबरोबर असभ्य वर्तवणूक,कॅमेरॅची मोडतोड.

22 ऑक्टोबर 13- अहमदनगर येथील महान्यूजच्या कॅमेरामनला  कव्हरेज करतानाच मारहाण

30 ऑक्टोबर 13- यवतमाळ जिल्हयातील वणी येथील पुण्यनगरीच्या कार्यालयावर शिवसैनिकांचा हल्ला.मोट्या प्रमाणात मोडतोड.

9 नोव्हेंबर      13- हदगाव येथील पत्रकार शिवाजी देशमुख यांच्यावर चाकूहल्ला.वरती त्यांच्यावरच खंडणी,ऍट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल.

14 नोव्हेंबर    13- चाळीसगाव तालुक्यातील टाकळी येथील नरेश सोनार यांची गाडीतून बाहेर फेकून हत्त्या.परप्रांतिय टोळीचे कृत्य.

25 नोव्हेबर    13- कंधार येथील लोकपत्रचे पत्रकार उत्तम चव्हाण यांना मनसे तालुका प्रमुखाकडून धमक्या.पोलिसात तक्रार दाखल.

30 नोव्हेबर   13 माजलगाव  येथील सुराज्यचे पत्रकार संतोष जेथलिया यांना धमक्या.नगराध्यक्षांच्य विरोधात बातमी छापल्याने रागातून प्रकार.तक्रार दाखल.
[divide]
सदरची माहिती पुनर्मुद्रीत करताना निमंत्रक, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या  असा उल्लेख करणे आवश्यक आहे. –

[divide]

डोगराला लागलेल्या आगीत तळ्यात मोठे नुकसान

0
रायगड जिल्हयात डोंगरांना आणि जंगलांना आगी लावण्याचे प्रकार वाढले असून काही दिवसापूर्वी खालापूरनजिकच्या डोांगराला लागलेल्या आगी नंतर सोमवारी तळे किल्ला परिसरातील डोंगराला लागलेल्या वणव्यात 60 ते 70 एकरात लावलेल्या ओवा,काजू झाडांचे मोठे नुकसान झाले आहे.
वणवा लागलेला परिसरात विपूल प्रमाणात जैवविविधता आहे.औषधी वनस्पतीबरोबरच साग,खैर,शिसव,अशी मौल्यवान वनसंपदा तेथे आढळते.या परिसरात चंदनाचीही झाडे असल्याने वनसंपदेचे मोठे नुकसान झाले आहे.वणवा कोणी का लावला याचा तपास लागलेला नाही.लागलेली आग आटोक्यात आणण्याचा वनविभागाने प्रयत्न केला असला तरी अजूनही आग धुमसत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
रायगड जिल्हयात जानेवारी ते मार्च या काळात डोंगरांना वणवे लागण्याचे अनेक प्रकार घडतात.यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात वनसंपदा जळून भस्मसात होते.जंगली प्राण्याच्या शिकारीसाठी ,लाकडं मिळविण्यासाठी हे वणवे लावले जातात असे सांगितले जाते.मात्र वर्षानुवर्षे हे वणवे लागत असले तरी त्यातले आरोपी सापडत नाहीत किंवा त्यांच्यावर कारवाईही होत नाही.डोगराला आग लावल्यामुळे वनविभागाने कोणावर कारवाई केल्याचे एकही उदाहरण नाही.

पनवेल वडाळे तलावात मत्स्यालय उभारणार

0

[divide style=”3″]

fish.jpg1potoपनवेल | वार्ताहर | पनवेल नगरपलिकेने वडाळे तलावात मत्स्यालय उभारण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून त्यामुळे भविष्य काळात पनवेलकरांना पाण्याच्या आतून विविध प्रकारच्या माशांचे निरीक्षण करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
वडाळे तलावात बोगदा खणला जाणार असून अंतर्गत मत्स्यालय उभारण्याची योजना पालिकेने आखली आहे. त्यामुळे पनवेलच्या पर्यटन महसुलात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या पनवेलमधील वडाळे तलावात हा प्रकल्प उभा करण्यात येत असल्याची माहिती पालिकेच्या अधिकार्‍यांनी दिली.
पनवेल शहराला जुना इतिहास आहे. तसेच १८५२ पासून पालिकेचे अस्तित्व आहे. महाराष्ट्रातील सर्वात जुनी पालिका असल्याचे बोलले जाते. यावेळी अधिकार्‍यांनी सांगितले की, हा प्रकल्प बीओटी तत्वावर विकसित केला जाणार आहे. त्यानुसार निविदा मागविण्यात येणार आहे. या प्रकल्पाबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे असे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले.

पेण तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी 1कोटी 16 लाखांचा कृती आराखडा

0

पेण तालुक्यातील पाणी टंचाईशी सामना करण्यासाठी यंदा 1 कोटी 16 लाख रूपयांचा कृती आराखडा  जिल्हा प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे.त्यातील 51 लाख 50 हजार रूपये टंचाईग्रस्त गावांना टॅंकर अथवा बैलगाडीने पाणी पुरवठा करण्यासाठी खर्च होणार आहेत.शहापाडा पाणीपुरवठा योजनेची दुरूस्ती करण्यासाठी 47 लाख 50 हजार विंधन विहिरींच्या दुरूस्तीसाठी 50 हजार,विंधन विहिरी खोदण्यासाठी 16 लाख 84 हजार ,विंधन जलभंजनसाठी 5 हजार रूपये खर्च प्रस्तावित आहे.
पेण तालुक्यातील शिक्री चाळ विभागाातील गावांना पाणी टंचाईचा चांगलाच फटका बसतो त्यामुळे या विभागातील 39 गावं आणि 91 वाड्यांना यंदा टॅंकरने पाणी पुरवठा केला जाणार आहे.तालुक्यात शहापाडा,आंबेगाव आणि हेटवणे ही तीन मोठी धरणे असतानाही तालुक्याला दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत असल्याने जनतेत नारीजी व्यकत केली जात आङे.

POPULAR POSTS

error: Content is protected !!