मुंबई-गोवा महामार्गाचा पुरता बोजवारा उडालेला असताना आणि महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली पाच वर्षे रेंगाळलेले असताना आता वाकण ते खोपोली हा मार्ग चौपदरीकरणास सरकारने मान्यता दिली आहे.मुंबई- गोवा महामार्गास पर्याय ठरू शकणारा हा मार्ग महत्वाचा आहे असे सरकारला वाटते.हा रस्ता इंड्रस्टी्रॅयल कॉरिडोरमध्ये तर येतोच त्याचबरोबर हा रस्ता चौपदरी झाला तर पाली या तीर्थक्षेत्राचा विकास होऊ शकेल अशीही सरकारची धारणा आहे.सरकारची योजना तर चांगली आहे मात्र हा रस्ता किती दिवसात पूर्ण होईल हे मात्र सरकार सांगत नाही.या रस्त्यावरून 18563 पीसीयु वाहतूक होते त्यामुळे भारतीय रस्ते महासभेच्या मानांकनानुसार हा रस्ता चौपदरी होणे आवश्यक असल्याचे सरकार सांगते.त्यामुळे सरकारने 19 ऑगस्ट 2016 रोजी एक जीआर काढून या रस्त्यास मंजुरी दिली असून त्यासाठी कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंहामंडळास मान्यता देण्यात आली आहे.या मार्गास 30-11-15रोजी झालेल्या मंंत्रिमंडळ पायाभूत समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती.त्यानुसार आता जीआर काढला गेला आहे.सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करायला हवे मात्र हा रस्ताही मुंबई-गोवा महामार्गासारखा रखडणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी एवढीच अपेक्षा आहे.-