अलिबाग-आक्षी जुना पूल बंद होणार

0
823

महाड दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर अलिबाग- आक्षीला जोडणारा आक्षी खाडीवरचा ब्रिटिशकालिन पूल 10 ऑगस्टपासून वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय बांधकाम विभागाने घेतला आहे.स्थानिक ग्रामपंचायचतीने तशी मागणी यापुर्वीच केलेली होती.

अलिबागला रेवदंड,मुरूडला जोडणारा हा पूल 1931 मध्ये बांधण्यात आला होता.या पुलाचे स्ट्रक्चलर ऑडीट केल्यानंतर या पुलाला पर्यायी दुसरा पूल बांधण्यात आला होता ,मात्र तरीही जुना पूल वाहतुकीसाठी सुरूच होता.अलिबागहून आक्षाच्या दिशेने जाणारी वाहन जुन्या पुलावरून जात तर आक्षीहून अलिबागकडे येणारी वाहनं नवीन पुलावरून जात असत मात्र महाड दुर्घटनेनंतर धोकादायक ठरलेला हा पूल कायम स्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी 10 ऑगस्टपासून होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here