अवधूत तटकरें ‘वेगळ्या वाटेवर ‘

0
860

र फिरले की घराचे वासेही फिरतात’ असं म्हणतात .राष्ट्रवादीची अवस्था तशीच झाली आहे.कालपर्यंत जवळची माणसं राष्ट्रवादीला गुडबाय करीत होती.आता घरातली माणसंही तसा विचार करू लागली आहेत.पुढारीनं आज दिलेली बातमी सत्य ठरली तर येत्या 17 ऑगस्टला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे येत्या  भाजपत दाखल झालेले असतील.श्रीवर्धन मतदार संघातून अवधूत तटकरे शिवसेनेच्या विरोधात निसटत्या मताने निवडून आले.मात्र नंतरच्या काळात सुनील तटकरे विरूध्द अनिल तटकरे आणि अवधूत तटकरे असे गृहयुध्द सुरू झाले.त्यातूनच मग सुनील तटकरे यांनी अवधूत तटकरे यांना श्रीवर्धनमध्ये पर्याय शोधायला सुरूवात केली.सुनील तटकरे यांचे  चिरंजीव अनिकेत तटकरें श्रीवर्धनमध्ये सक्रीय झाल्याने स्वाभाविकपणे अवधूत तटकरे अस्वस्थ झाले.त्यातून नाराजी व्यक्त होऊ लागली.सुनील तटकरेंच्या अनेक कार्यक्रमांना अवधूत तटकरेंची अनुपस्थिती प्रकर्षानं जाणवू लागली.परवा तर अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत माणगावमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यासही अवधूत तटकरेंनी दांडी मारली.याची चर्चा तर होणार होतीच ती आता खुलीआम सुरू झाली .एकीकडे अजितदादांनी सुनील तटकरेंना भावी मुख्यमंत्री म्हणून जाहीर केले त्याच वेळेस त्यांच्या घरातूनच दादांच्या स्वप्नांना सुरूंग लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र सध्या रायगडात दिसते आहे.पुढारीनं अवधूत तटकरेंना ‘तुम्ही मेळाव्यास का अनुवपस्थित होतात’ असा सवाल केला तेव्हा त्यांनी ‘मला काही म्हणायचं नाही’ असं उत्तर दिलं.दुसरीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनीही या विषयावर मौन पाळणे पसंत केले .

भाजप स्वतंत्रपणे लढेल अशी अपेक्षा करून अवधूत तटकरे भाजपमध्ये जाण्याचे मनसुबे आखत आहेत.कारण श्रीवर्धनमध्ये भाजपकडे उमेदवार नाही.अवधूत तटकरे भाजपचे उमेदवार होऊ शकत असले तरी तेथे  भाजपचा नव्हे तर शिवसेनेचा प्रभाव आहे.मागच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार कृष्णा कोबनाक यांना अवघी 11 हजार 295 मते मिळाली होती.राष्ट्रवादीच्या अवधूत तटकरेंना 61 हजार 38 आणि शिवसेनेच्या रवी मुंढे यांना 60 हजार 961 मते मिळाली होती .60-70 मतांच्या फरकाने राष्ट्रवादीचे अवधूत तटकरे ती निवडणूक जिंकले होते.शिवसेनेत फाटाफुट झाली नसती तर अवधूत तटकरेंचा पराभव नक्की होता.श्रीवर्धनची उमेदवारी राष्ट्रवादी आपणास देणार नाही हे अवधूत तटकरेंना आता नक्की समजले आहे.अशा स्थितीत आताच अन्य पक्षात उडी घेऊन मतदार संघाची बांधणी केली तर पुढील तीन वर्षात परिस्थिती अनुकूल होऊ शकेल असे अवधूत तटकरेंना वाटत असावे.मात्र ही लढाई त्यांच्यासाठी सोपी नाही.आजची स्थिती कायम राहिली तर विधान सभेतही राष्ट्रवादी -शेकाप युती होऊ शकते.त्याचा फायदा राष्ट्रवादी घेऊ शकते.कारण शेकापची हक्काची 12-15 हजार मतं श्रीवर्धनमध्ये आहेत.तेथे शिवसेनेचा प्रभाव असला तरी शिवसेनेत मोठा अतंर्कलह आहे.त्याचा फटका बसू शकतो.त्यामुळे अवधूत तटकरेसाठी इकडे-आड तिकडे विहिर अशी स्थिती आहे.पण त्यांना काही तरी रिस्क घ्यावीच लागेल.भाजपबद्दल ममत्व दाखवत त्यांनी तसा निर्णय घेतला तर  राष्ट्रवादीचा एका मासा गळाला लागला एवढाच काय तो आनंद भाजपला मिळविता येईल त्यातून फार काही साध्य होणार नाही कारण जिल्हयाच्या राजकाऱणात अवधूत तटकरे हे कायम तटकरेच्यां सावलीत वावररेलेले असल्याने त्यांना आपला स्वतःचा गट किंवा दबदबा निर्माण करता आलेला नाही.त्यांनी जिंकलेली निवडणूक ही काकांची पुण्याई आहे हे त्यांनाही मान्य करावे लागेल-SM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here