पत्रकारांवरील वाढते हल्ले, विधान परिषदेत चर्चा होणार

0
908

नागपूर येथील पाच पत्रकारांना आश्रम शाळेत झालेली मारहाण आणि राज्यात पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त करीत विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषद नियम 93 अन्वये सूचना दाखल केली असून पुढील आठवडयात या मुद्दयावर विधान परिषदेत चर्चा होणार आहे.
या सूचनेव्दारे श्री.धनंजय मुंडे यांनी पत्रकारांवर होणार्‍या हल्ल्लयांकडे सरकारचे लक्ष वेधले असून राज्यात पत्रकारांना संरक्षण देणारा कायद सत्वर पारित करावा अशी मागणी केली आहे.राज्यात गेल्या सहा महिन्यात पन्नास पत्रकारांवर हल्ले झाले असून त्यात 61 पत्रकारांना मारहाण झाली आहे.21 पत्रकारांना ठार मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या आहेत आणि 13 पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत असा माहिती सूचनेव्दारे मुंडे यांनी दिली आहे.नागपूर प्रकरणात पत्रकारांवर हल्ले करणार्‍यांच्या विरोधात अद्याप कोणतीच कारवाई केली गेली नसल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा करावा या मागणीसाठी धनजंय मुंडे प्रारंभापासूनच पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या पाठिसी असून विविध वैधानिक अस्त्रांचा उपयोग करीत त्यांनी पत्रकारांवरील हल्ल्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित केलेला आहे.पुन्हा नियम 93 अन्वये त्यांनी हा विषय चचेर्र्ला आणण्याचा निर्णय मुंडे यांनी घेतल्याबद्दल पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तसेच मराठी पत्रकार परिषदेने धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here