मराठी पत्रकार परिषदेच्या निवडणुका ऑनलाईन होणार

0
2082
मराठी पत्रकार परिषदेच्या निवडणुका ऑनलाईन होणा

मराठी पत्रकार परिषदेच्या व्दैवार्षिक निवडणुका बॅलेटपेपरव्दारे होतात.म्हणजे मतपत्रिका सदस्यांनी दिलेल्या पत्त्यावर पाठवून त्या परत मागविल्या जातात.ही पध्दत वेळ खाऊ आणि खर्चिक आहे.तसेच या व्यवस्थेतील अनेक त्रुटी समोर आलेल्या आहेत.विशेषतः मतपत्रिकाच मिळाल्या नाहीत अशी सार्वत्रिक तक्रार असते.बदलत्या काळात या प्रक्रियेत बदल करणे गरजेचे असल्याने परिषदेच्या 2017 मध्ये होणार्‍या निवडणुका ऑन लाईन पध्दतीनं घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.म्हणजे परिषदेचा सदस्य जो मोबाईल नंबर परिषदेकडे नोंदवेल त्यावरून आपल्याला आपल्या पसंतीच्या उमेदवारास मतदान करता येईल.त्यासाठी सॉफ्टवेअर विकसित करण्याचं काम सुरू करायचं आहे.काही एजन्सीशी या संदर्भाथ बोलणी झालेली आहे.प्रयोगादाखल एका जिल्हयातील निवडणुकांसाठी या तंत्राचा अगोदर वापर केला जाईल त्यानंतर परिषदेच्या निवडणुकांसाठी ऑनलाईन तंत्र वापरले जाईल.साधारणतः डिसेंबरमध्ये परिषदेची मतदार यादी तयार होते.त्यामुळे जिल्हा संघांना विनंती आहे की,आपली सदस्य यादी परिषदेकडे पाठविताना प्रत्येक सदस्यांचा पोस्टल अ‍ॅड्रेस तसेच मोबाईल नंबर न विसरता पाठविला पाहिजे.कारण ज्यांचे मोबाईल नंबर परिषदेकडे येणार नाहीत त्यांना या मतदान प्रक्रियेत भाग घेता येणार नाही.आरंभी हे काम थोडे त्रासदायक वाटणार असले तरी ते आवश्यक आहे.आम्ही पुणे जिल्हयाची यादी त्यादृष्टीने परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. डिसेंबरला आणखी कालावधी असला तरी या काळात मतदार याद्या परिपूर्ण करून त्या सदस्यत्व शुल्क तसेच संलग्नता शुल्कासह ( फक्त चेकने ,रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही) लवकरता लवकर पाठवाव्यात.31 डिसेंबरनंतर आलेली कोणतीही यादी स्वीकारली जाणार नाही,(कारण हा सारा डाटा सॉफ्टवेअर मध्ये फिड करावा लागणार आहे.) तेव्हा सर्व जिल्हा संघांनी त्यादृष्टीने सहकार्य करावे.आ्रॅनलाईन मतदान पध्दत यशस्वी झाली तर अनेक अडचणी दूर होऊ शकतील,आणि निवडणुका अधिक पारदर्शक पध्दतीनं पार पडतील.या बदलासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे.या संदर्भात काही सूचना असतील तर त्याचेही स्वागत आहे.

 एस.एम.देशमुख 
अध्यक्ष 
मराठी पत्रकार परिषद, 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here