वृतपत्र विक्रेत्याचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार – आ. अमिताताई चव्हाण

0
930

नांदेड – उन्हाळा, हिवाळा, पावसाळा वाचकांना वर्तमानपत्र पोचवण्याची जबाबदारी अत्यंत निष्ठेने पार पाडनारे वृतपत्र विक्रते यांचे योगदान माध्यमांमध्ये खुप मोठे आहे. त्याचे प्रश्न सोडविण्याचे आपण प्रयत्न करू अशी ग्वाही आ. सौ. अमिताताई चव्हाण यांनी आज येथे बोलताना दिली.
राज्य वृतपत्र विक्रेता संघटनेचे सरचिटणीस व जिल्हाध्यक्ष बालाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली मंडळाच्यावतीने आज वृतपत्र विक्रेत्यांच्या मागण्याचे निवेदन आ. अमिताताई चव्हाण यांना सादर करण्यात आले. त्यामध्ये शहरातील वृतपत्र विक्रेत्यांसाठी महापालिकेच्या वतीने सेंटर शेड उपलब्ध करून देण्यात यावे. शहरातील स्टाॅससाठी कायमस्वरूपी जागा देण्यात यावी. वृतपत्र विक्रेत्याचा घरकुल योजनेत समावेश करण्यात यावा आदी मागण्याचा समावेश करण्यात आला आहे . यासंदर्भात आम्ही सहा ते सात वर्षापासून पाठपुरावा करत असून जिल्हाधिकारी व महापौर यांनी लेखी पत्र आयुक्त यांना दिली आहेत पण आम्हाला आजपर्यंत आश्वासनाच्या पलीकडे काहीही मिळाले नाही तेंव्हा आपण लक्ष घालावे असे निवेदन देताना बालाजी पवार म्हणाले.
यासंदर्भात बोलताना आ. अमिताताई चव्हाण म्हणाल्या की ऊन, पाऊस कशाचीही तमा न बाळगून नागरिकांसाठी भल्या पहाटेपासून वर्तमानपत्राची सेवा उपलब्ध करून देणाऱ्या वृतपत्र विक्रेत्यांना त्यांचे हक्काचे स्थान शेडच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करू तसेच वृतपत्र विक्रेत्यांच्या इतरही मागण्यांसाठी महापालिकेकडे प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष व राज्य सरचिटणीस बालाजी पवार , सरदारसिंह चौहान, उपाध्यक्ष गणेश वडगावकर, सचिव चेतन चौधरी, बाबू जल्देवार, आवधूत सावळे, खयुम पठाण, सत्यनारायण देवरकोंडा, संगमनाथ भालके, साईनाथ पसलवाड, आवधूत पसलवाड, सुनील सावंत, शेषराव हूसे, दिलीप सोनटक्के, बालाजी भेटकर, नरेश वंगलवार, गणेश रत्नपारखे, राजेश पवार आदींची उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here