भायमळा घटनास्थळासही भेट
अलिबाग नजिकच्या भायमळा येथील फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटातील जखमींची रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांनी अलिबागच्या शासकीय रूग्णालयात जाऊन विचारपूस केली.तसेच तटकरे यांनी घटनास्थळासही भेट दिऊन पाहणी केली.अपघातात जे ठार आणि जखमी झाले आहेत त्यांच्या नातेवाईकांना सरकारकडून मदत देण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल अशी माहितीही सुनील तटकरे यांनी दिली.स्फोट आणि आगीची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तींविरूध्द कडक कारवाई करण्यात येईल असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.गंभीर त्रुटी असलेल्या कारखान्याचे परवाने रद्द कऱण्याचे सुतोवाचही तटकरे यांनी केले.
दरम्यान अपघातात ठार झालेल्यांपैकी तिघांची ओळख पटली आहे.