मच्छिमार आंदोलकांची अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक

0
925

आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या अलिबाग आणि पेणच्या धरमतरखाडी काढच्या मच्छिमारांच्या संयमाचा बांध आज अखेर फुटला.त्यांनी आज अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यलयावर तुफान दगडफेक केली.या दगडफेकीत तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले असून शहरातील वातावरण तंग बनले आहे.पोलिसांनी रॅपिड ऍक्शन फोर्सची तुकडी शहरात तैनात केली आहे.

धरमतर खाडी काढच्या कंपन्यांचे रासायनिक पाणी खाडीत सोडले जाते त्याचा मच्छिमारीवर परिणाम होत आहे.तसेच पीएनपी आमि इस्पात कंपनीच्या मोठ्या बार्जेसमुळे मच्छिमारांचे नुकसान होत आहे.त्याचा बंदोबस्त करावा यामागणीसाठी 18 गावातील 1800च्यावर मच्छिमार गेली अनेक वर्षे शांततेच्या मार्गाने ंआंदोलन करीत आहेत मात्र सरकारने त्यांच्या मागण्याकडे लक्ष दिले नाही.त्यामुळे 22 जानेवारी रोजी मच्छिमारांनी जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस दिली होती.त्यानंतर मच्छिमारांच्या प्रतिनिधींची 7 फेब्रुवारी रोजी प्रांत दीपक क्षीरसागर यांच्याशी चर्चाही झाली होती मात्र त्यातून काही निष्पण्ण न झाल्याने मच्छिमारांनी 11 फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केेले होते.आंदोलनास 18 दिवस झाल्यानंतरी सरकार काही दखल घेत नाही म्हटल्यावर आंदोलक संतापले आणि त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयालाच आपले लक्ष्य बनविले.आंदोलकांनी जिल्ङिधाकीरी कार्यालायवर तुफान दडगफेक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here