रायगडच्या विकासासाठी 500 कोटी -मुख्यमंत्री

0
848
रायगड किल्ला आणि परिसराच्या सर्वांगिण विकासासाठी कोकण विभागीय आयुक्तांनी तयार केलेल्या 500 कोटी रूपयांच्या आराखडयास आपण याच ठिकाणी मंजुरी देत आहोत अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि रायगडचा सारा आसमंत टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून गेला.
भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती आणि दुर्गराज रायगड यांच्यावतीने रायगडावर आज 343 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा कऱण्यात आला.त्यावेळी उपस्थित हजारो शिवभक्तांच्यासमोर मुख्यमंत्री बोलत होते.ते म्हणाले,गड किल्ले आपले वैभव असून त्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकार कटीबध्द आहे।   त्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही .
मराठा आरक्षणाच्या संदर्भात बोलताना मुख्यमंत्र्यांनी आमच्या सरकारची भूमिका आरक्षणाच्या बाजुची असून विधिमंडळात देखील आम्ही यासंबंधीचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे. आता भक्कम संशोधन करून न्यायालयात बाजू मांडण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले
प्रारंभी युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी आपल्या भाषणात राज्य शासनाने गड किल्ल्यांच्या संर्वधनासाठी अधिक प्राधान्य देण्याची मागणी केली.यावेळी फडणवीस  यांच्या हस्ते ‘राजधानी रायगड ‘ या कॉफी टेबलबुकचे प्रकाशन कऱण्यात आले.कार्यक्रमास शिक्षण मंत्री विनोद तावडे उपस्थित होते.
दोन दिवस चाललेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्यभरातून हजारो शिवभक्त गडावर दाखल झाले आहेत.दोन दिवस गडावर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here