-ज्येष्ठ नागरिक धोरण लवकरच जाहीर करणार 

0
781
समाज उभारणीत ज्येष्ठ नागरिकांचा असलेला मोलाचा वाटा विचारात घेऊन लवकरच ज्येष्ठ नागरिक धोरण घोषित करण्यात येईल अशी माहिती बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.अलिबाग येथे नव्यानेच उभारण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक भवनाचे उद्घघाटन काल चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले तेव्हा ते बोलत होते.ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्‍नांकडे सरकार सहानुभुतीने बघत असून आपले प्रश्‍न सोडविण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ त्यांच्यावर येणार नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
यावेळी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून अलिबागमध्ये वायफाय सेवा सुरू कऱण्याची तसेच अलिबागेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची घोषणा केली.कार्यक्रमास आमदार पंडित पाटील नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्यासह शहरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here