रविवारी नंदुरबारला मराठी पत्रकार
परिषदेचे विभागीय अधिवेशन
नंदुरबार दि . ९-
देशातील मराठी पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेचे उत्तर महाराष्ट्राचे एकदिवसीय अधिवेशन रविवार दिनांक 22 मे रोजी शिवाजी महाराज नाटय मंदिर नंदुरबार येथे होत असल्याची माहिती नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेंद्र दोरकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघाने या अधिवेशनाचे यजमानपद स्वीकारलेले आहे
अधिवेशाच्या निमित्तानं मान्यवरांचे विचार पत्रकारांना ऐकण्यास मिळणार असून संघटना अधिक बळकट करण्यासाठी देखील अधिवेशनात विचार विनिमय होणार आहे.परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांचे मौलिक मार्गदर्शन यावेळी पत्रकारांना लाभणार आहे..अधिवेशनाचे उदघाटन डॉ.खा.हिना गावित यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख भूषविणार आहेत.अधिवेशनात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांचे विचार एकण्याची संधीही पत्रकारांना मिळणार आहे.
मराठी पत्रकार परिषदेने जिल्हास्तरिय आणि विभागीय अधिवेशने भरवून पत्रकार संघटन अधिक भक्कम करण्याचा निर्णय घेतला आहे. पत्रकारांचे प्रश्न अधिक आक्रमकपणे मांडण्याच्या दृष्टीने अधिवेशनात धोरण नक्की कऱण्यात येणार आहे. .या अधिवेशनास नाशिक,जळगाव,धुळे,नगर जिल्हयातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून महाराष्ट्राच्या अन्य भागातूनही पत्रकार येणार आहेत.अधिवेशनास जास्तीत जास्त पत्रकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन परिषदेचे विश्वस्त किरण नाईक , कार्याध्यक्ष सिध्दार्थ शर्मा,सरचिटणीस यशवंत पवार,कोषाध्यक्ष मिलिंद अष्टीवकर,विभागीय सचिव मीनाताई मुनोत तसेच नंदुरबार जिल्हा अध्यक्ष योंगेद्र दोरकर यांनी केले आहे.