माथेरानची राणी सुरक्षितता आणि तांत्रिक कारणांसाठी बंद करण्यात आली आहे.ती लवकरच पुन्हा सुरू केली जाईल असे आश्वासन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिल्याने माथेरानकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
माथेरानची रेल्वे अनिश्चित काळासाठी बंद कऱण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर काल माथेरानच्या एका सर्वपक्षीय शिष्टमंडळाने सुरेश प्रभू यांची मुंबईत भेट घेतली आणि माथेरानची मिनिट्रेन परत सुरू करण्याची मागणी करणारे निवेदन त्यांना दिले.त्यावर बोलताना सुरेश प्रभू यांनी माथेरानची रेल्वे ही देशाची शान असून ती बंद पडू दिली जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.आरंभी अमन लॉज ते माथेरान अशी शटल सेवा सुरू केली जाईल.त्यानंतर नेरळ ते माथेरान सेवा सुरूळीत केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी रेल्वेचे उपमहाव्यवस्थापक साकेत मिश्रा आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते