माथेरानच्या मिनी ट्रेनचा  वेग  कमी होणार 

0
815
सातत्यानं अपघातग्रस्त होत असलेल्या नेरळ-माथेरान मिनिट्रेनची वेगमर्यादा तब्बल 22 धोकादायक ठिकाणी कमी करण्याचा निर्णय रेल्वेने धेतल्याने नेरळ-माथेरान हे 21 किलो मिटरचे अंतर कापायला मिनिट्रेन आता अधिक वेळ घेणार आहे.
माथेरान मिनिट्रेनचे रेल्वे डबे वारंवार रेल्वे रूळावरूऩ घसरत असल्याचे दिसून आले आहे.गेल्याच आठवडयात अमन लॉजच्या जवळ रेल्वेचा डबा रूळावरून घसरल्याने वाहतूक खोळंबा तर झाला होताच त्याचबरोबर या रेल्वेमार्गाच्या सुरक्षिततेचीही चर्चा सुरू झाली होती.या मार्गावरील अभियांत्रिकी कामे आणि दखभालीसंबंधीच्या कामांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आता होत आहे.
सध्याच्या वेगमर्यादेनुसार माथेरान रेल्वेला आपला प्रवास पूर्ण करायला साधारणतः दोन तास लागतात.मात्र 22 ठिकाणी वेगमर्याद आणखी कमी करावी लागल्यास माथेरानला पोहोचायला अडीच ते तास लागू शकतात.त्यामुळं हा प्रवास लाबंणार असून त्याचा नक्कीच प्रवासी संख्येवर परिणाम होणार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आङ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here