साडेसातशे कोटी रूपयांच्या पेण अर्बन बँक घोटाळ्यातील आणखी दोन आरोपींना पेण
पोलिसांनी काल रात्री अटक केली.प्रतोष रामबहादूर सिंग आणि शांताराम भिकू पाटील
अशी या दोघांची नावे आहेत.दोघांनाही आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने
त्यांना 10 मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.पेण अर्बन बॅक
घोटाळ्यात आतापर्यंत 55 आरोपीना अटक कऱण्यात आली असली तरी 33 आरोपी अद्याप
फरारी आहेत.
प्रतोष सिंग आणि शांताराम पाटील यांनी स्वानंद कन्स्टक्शन पायव्हेट लिमिटेड
नावाची कंपनी स्थापन करून पेण अर्बन बॅकेच्या दादर येथील शाखेतून कंपनीच्या
नावे 7 कोटीचे कर्ज घेतले होते.हे कर्ज प्रकरण बनावट असल्याचे चौकशीत निष्पण्ण
झाले.त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांना समाधानकारक
उत्तरे देता आली नाहीत.त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.