मी लेकरातच देव पाहात असल्याने मला मंदिरात जायची गरजच वाटत नाही,असं काही काम करा की,देवच तुमच्याकडं येईल अशा शब्दात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी महिलांच्या मंदिर प्रवेशावरून सध्या सुरू असलेल्या वादावर आपल्या भावना व्यक्त केल्या.
श्रीवर्धन देवज्ञ सोनार विकास मित्रमंडळ आणि महिला मंडळाच्यावतीने काल श्रीवर्धन येथे सिंधुताईंचा सत्कार करण्यात आला.त्यावेळी त्यांनी तासभर आपलं मनोगत व्यक्त केलं.महिलांच्या अंगप्रदर्शनास त्यांनी पुन्हा विरोध दर्शवत अंग प्रदर्शन करू नका,आपलं सौदर्य झाकून ठेवा असा सल्ला त्यांनी दिला.अनाथांची माय सिंधुर्तांचे विचार ऐकण्यासाठी यावेळी श्रीवर्धनकरांनी मोठी गर्दी केली होती.-