मधू कांबळे यांना वरुणराज भिडे पुरस्कारजाहीर

0
953
पुणे – पत्रकार वरुणराज भिडे मित्रमंडळाचा वरुणराज भिडे पुरस्कार “लोकसत्ता‘चे सहसंपादक मधू कांबळे (मुंबई) यांना जाहीर झाला आहे. तर आश्‍वासक पत्रकारिता पुरस्कार “सकाळ‘चे खास प्रतिनिधी गजेंद्र बडे (पुणे), “दिव्य मराठी‘चे श्रीनिवास दासरी (सोलापूर), “महाराष्ट्र वन‘च्या प्राची कुलकर्णी (पुणे) यांना जाहीर झाला आहे.
मित्रमंडळाचे विश्‍वस्त उल्हास पवार यांनी सोमवारी या पुरस्कारांची घोषण केली. ज्येष्ठ पत्रकार वरुणराज भिडे यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित सोहळ्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी (ता. 30) एस. एम. जोशी सभागृह येथे सकाळी दहा वाजता वितरण होणार आहे. या वेळी 
राजकीय अभ्यासक सुहास पळशीकर उपस्थित असणार आहेत. पुरस्कार निवड सामितीत ज्येष्ठ पत्रकार एस. के. कुलकर्णी, सदा डुंबरे, अरुण खोरे, 
जयराम देसाई यांचा समावेश आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here