डीआयओ कार्यालयांसमोर सोमवारी पत्रकारांची निदर्शने

0
694

 

पेन्शन,संरक्षण कायदा आणि मजिठियाच्या  प्रश्‍नावर पत्रकार संघटना आक्रमक  

वृत्तपत्र जाहिरात दरवाढीच्या मागणीसाटी

मराठी पत्रकार  परिषदेचे सोमवारी आंदोलन

मुंबई दि ,२२ ( प्रतिनिधी )शासनाच्यावतीने वृत्तपत्रांना देण्यात येणार्‍या जाहिरात धोरणात सुसुत्रता आणावी,जाहिरात दरातील प्रलंबित दरवाढ तातडीने लागू करावी या प्रमुख मागण्यांसह मजिठियाची अंमलबजावणी करावी,पत्रकारांना पेन्शन योजना सुरू करावी आणि पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठीचा कायदा तातडीने मंजूर करावा या मागण्यांसाठी मराठी पत्रकार परिषदेच्यावतीन सोमवार दिनांक 25 एप्रिल रोजी राज्यभर जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेच्या प्रसिध्दी पत्रकात देण्यात आली आहे.

सरकारचे जाहिरात धोरण छोटया वृत्तपत्रांचा गळा घोटणारेच आहे.दरात आणि जाहिरात वितरणात  सुसूत्रता नसल्याने छोटी वृत्तपत्रे चालविणे उत्तरोत्तर कठिण होत आहे.शिवाय गेली अनेक वर्षे दरवाढही दिली गेलेली नाही.या सर्वाच्या निषेधार्ह तसेच मजिठियाची त्वरित अंमलबजावणी करावी या मागणीसाठी पत्रकार रस्त्यावर येत आहेत.पत्रकार पेन्शन योजना  तसेच पत्रकार संरक्षण कायद्याच्या संदर्भातही केवळ आश्‍वासना खेरीज पत्रकारांच्या हाती काहीच लागत नसल्याने राज्यभर पत्रकारांमध्ये संतापाची भावना आहे.या विरोधात आवाज उठविण्याचा निर्णय मराठी पत्रकार परिषदेने घेतला असून परिषदेशी संलग्न असलेले सर्व जिल्हा संघ तसेच समविचारी अन्य पत्रकार संघटना या लढ्यात सहभागी होत आहेत.संपूर्ण राज्यातील पत्रकार सोमवारी जिल्हा माहिती अधिकारी यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करतील आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावे वरील मागण्यांचे एक निवेदन जिल्हा माहिती अधिकारी यांना सादर करतील.अशी माहितीही परिषदेच्या पत्रकात देण्यात आली आहे.

वरील चारही प्रश्‍न केवळ पत्रकारांच्या जिव्हाळ्याचे नसून ते माध्यमांच्या अस्तित्वाशीही निगडीत असल्याने जास्तीत जास्त पत्रकारांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख,विश्‍वस्त किरण नाईक,कार्याध्यक्ष सिध्दार्थ शर्मा,सरचिटणीस यशवंत पवार,कोषाध्यक्ष मिलिंद अष्टीवकर आदिंनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here