2 कोटी झाडे लावणार 

0
783

वन महोत्सवानिमित्त 1 जुलै 2016 रोजी राज्यात 2 कोटी वृक्षांची लागवड करण्याचे राज्य सरकारने निश्‍चित केले आहे.वृक्ष लागवडीचे उद्द्ष्टि पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावर समित्या स्थापन केल्या आहेत. रायगड जिल्हयातील या समितीची पहिली बैठक काल जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी शीतल तेली यांनी वृक्ष लागवडीचे महत्व आणि त्यासाठी सरकारी योजनेची माहिती उपस्थितांना दिली.त्या म्हणालया,वृक्ष लागवडीचे काम केवळ उद्दिष्ट पूर्तीसाठी नसून ते पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी असल्याने सर्व विभागांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ते करावे .वृक्ष लागवडीबरोबरच वृक्षांचे संगोपणही झाले पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.रायगड जिल्हयातील जनतेनेही सरकारचा हा प्रकल्प पूर्ण कऱण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here