दिल्ली – मुंबई औद्योगिक कॉरिडॉरच्या विरोधात माणगावात मोर्चा

0
1130

ेदि ल्ली -मुंबई औद्योगिक कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी कॉरिडॉर विरोधी कृती समितीच्यावतीनं आज माणगाव येथील प्रांतकार्यालयावर मोर्चा काढण्यात आला .पांताधिकाऱ्यंान देण्यात आलेल्या निवेदनात कॉरिडॉरचा प्रकल्प रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.माोर्चाचे नेतृत्व समितीच्या प्रमुख उल्का महाजन यांनी केलं.मोर्चात तीन तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्यने सहभागी झाले होते.

माणगाव ,तळा आणि रोहा तालुक्यातील 78 गावच्या शेतकऱ्यांच्या 67,500 एकर जमिन या प्रकल्पात जाणार आहे.त्यामुळे या भागातील शेतक़ऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे.प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी 70 टक्के शेतकऱ्यांची संमती हवी असते मात्र शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध असल्याने कॉरिडॉरमधून दिघी पोर्ट प्रकल्प वगळण्यात आल्याचे पत्र डीएमआयसीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले होते.मात्र राज्य सरकारने पुन्हा या प्रकल्पांना मान्यता देऊन शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न चालविला असल्याचा आरोप उत्का महाजन यांनी जाहीर सभेत बोलताना केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here