एका महिन्यात 14 पत्रकारांवर हल्ले

0
784

राज्यात पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये चिंताजनक

वाढ,एका महिन्यात 14 पत्रकारांवर  हल्ले

मार्च महिन्यात राज्यातील पंधरा पत्रकारांवर शारीरिक हल्ले झाले आहेत.एकाच महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पत्रकारांवर हल्ले होण्याची ही पहिलीच घटना आहे.पुर्वी चार -पाच दिवसाला पत्रकारावर हल्ला केला जात होता.या महिन्यात दोन दिवसाला एका पत्रकारावर हल्ला झाला असून सरकार याकडे निर्विकारपणे पहात आहे.कायद्याचा पाळणा या अधिवेशनातही हालण्याची शक्यता नाही.2 मार्च पासून आजपर्यंत घाटकोपर,जत,भोकरदन,घाटकोपर,चंद्रपूर,पथराड(जळगाव),पुणे ,मुंबई,औरंगाबाद,अहमदनगर,उल्हासनगर,औराद शहाजनी,आणि पुणे जिल्हयातील शिरूर येथील पत्रकारांवर हे हल्ले झाले आहेत.यातील बहुतेक घटना बातमीसाठीच घडलेल्या आहेत.शिरूर येथे काल आप्पासाहेब ढवळे या पत्रकाराला पोलिस ठाण्यातच मारहाण केली गेली.ढवळे एका गुन्हयाची बातमी आणण्यासाठी ठाण्यात गेले असता तेथे हा प्रकार घडला.पत्रकारांबद्दलच्या असहिष्णूतेचं वातावरण वाढत असल्याचे दिसून येत आहे.या सर्व घटनांचा सर्वांनी तीव्र शब्दात धिक्कार केला पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here