पत्रकारांचे पुन्हा एकदा,
‘ एस.एम.एस.भडिमार’ आंदोलन
पत्रकार संरक्षण कायद्याचा मसुदा नागपूर अधिवेशनाच्या वेळेसच तयार करण्यात आला आहे.त्यावरच्या सूचना आणि आक्षेपही मागविले गेले,ते पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने पाठविले.मुख्यमंत्र्यांनीही वेळोवेळी आश्वासन दिलेलं आहे.असं असतानाही काल मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत ज्या पंधरा विधेयकांचा उल्लेख केला त्यात पत्रकार संरक्षण विधेयकाचा समावेश नाही.म्हणजे या अधिवेशनातही कायद्याचा पाळणा हालणार नाही.पेन्शनची तीच कथा आहे.एकीकडे शंभरावर आमदारांनी पत्रकार संरक्षण कायदा आणि पत्रकार पेन्शनच्या मागणीस लेखी पाठिंबा दिलेला आहे आणि दुसरीकडे सरकारची टोलवाटोलवी सुरू आहे.अशा परिस्थितीत राज्यात मोठे आंदोलन करण्याची गरज आहे.मात्र सध्याची दुष्काळी परिस्थिती आणि सामांन्यांशी निगडीत प्रश्नांनी धारण केलेल उग्र रूप लक्षात घेता रस्तयावर उतरून आदोलन करू नये असा सूर पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीतील बहुतेक सदस्यांनी व्यक्त केला.तो मान्य करावा लागत आहे.असे असले तरी सरकारला आपल्या प्रश्नाचंही गांभीर्य हे कळलेच पाहिजे.त्यासाठी पुन्हा एकदा एस.एम.एस.भडीमार आंदोलन करण्याचा निर्णय समितीनं घेतला आहे. म्हणजे 15 मार्च 2016 रोजी राज्यातील पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांच्या 09373107881 या मोबाईल नंबरवर एस.एम.एस चा मारा करून पत्रकारांच्या मागण्यांबद्दल आग्रह धरावा . .मुख्यमंत्र्यांबरोबरच दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांना एस.एम.एस.पाठवायचे आहेत.मागच्या आंदोलनाच्या वेळेस दहा हजारांवर एस.एम.एस मुख्यमंत्र्यांना गेले होते.यावेळेस किमान पंधरा हजारांवर एस.एम.एस मुख्यमंत्री आणि दोन्ही विरोधी नेत्यांना पाठवायचे आहेत.एस.एम.एसमध्ये “मागणीस शंभर आमदारांचा लेखी पाठिंबा.
आता पत्रकार पेन्शन आणि संरक्षण कायदा तातडीने मान्य करा”.
या अर्थाचा मजकूर असावा . सर्वांना विनंती आहे.एस.एम.एस भडिमार आंदोलन यशस्वी करून आपला संताप व्यक्त करावा.15 तारखेला समितीचे शिष्टमंडळ मा.मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे.त्यावेळी त्यांना शंभर आमदारांच्या पाठिंब्याची पत्रे सादर केली जाणार आहेत.खालील मोबाईलवर आपल्याला एसएमएस पाठवायचे आहेत.
मोबाईल नंबर्स
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- 9373107881
मा.राधाकृष्ण विखे पाटील 9821013853
मा.धनंजय मुंडे 9850777777
या नंबर्सवर सर्व पत्रकारांनी आपले मेसेज पाठवायचे आहेत.
लक्षात ठेवा,आपला एक एसएमएस लढ्याला यश मिळवून देऊ शकतो.
(सर्व पत्रकार मित्रांना विनंती की,ही बातमी आपण ज्या व्हॉटसअॅप ग्रुपवर आहोत अशा प्रत्येक ग्रुपला फॉऱवर्ड करावी.तसेच फेसबुकवरही ही बातमी पुढे सरकली पाहिजे.जास्तीत जास्त पत्रकार मित्रांपर्यंत हा मेसेज गेला पाहिजे.त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे ही पुनश्च विनंती)