राज्यातील 16 संघटनांचे प्रतिनिधीत्व करणार्या पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीची महत्वाची बैठक बुधवार दिनांक 17 फेब्रुवारी 2016 रोजी मुंबईतील मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यालायत दुपारी 2 वाजता होत आहे.पत्रकार संरक्षण कायदा आणि पेन्शनबाबत सरकारने वेळोवेळी आश्वासनं दिली पण विषय मार्गी लागत नाही.त्यानुषंगाने रोखठोक आणि निर्णायक भूमिका घेण्याची गरज आहे.त्यावर बैठकीत चर्चा होईल आणि निर्णय घेतले जातील.या बैठकीस समितीच्या सर्व सदस्याना निमंत्रित करण्यात आले आहे.राज्यातील विविध 16 संघटनांचे विद्यमान अध्यक्ष समितीचे सदस्य आहेत.
– एस.एम.देशमुख