पर्ससीन बंदीचे रायगडात स्वागत 

0
1065
सागरी किनारपट्टी क्षेत्रात पर्ससीन पध्दतीनं होणार्‍या मासेमारीस यापुढे परवाने न देण्याच्या सरकारी निर्णयाचे रायगडमधील पारंपारिक पध्दतीनं मासेमारी करणार्‍या मच्छिमारांनी स्वागत केले आहे.या पध्दतीनं होत असलेल्या मासेमारीमुळे माश्यांच्या अनेक प्रजाती इतिहास जमा होत असल्याचे दिसून आले असून समुर्दीय पर्यावरणावरही त्याचा परिणाम होत असल्याने हा निर्णय घेतला गेल्याचे सांगण्यात येते.1995 नंतर मोठ्या प्रमाणात पर्ससीन पध्दतीनं खोल समुद्रात मासेमारी होत असे मात्र अलिकडे समुद्र किनार्‍याजवळ कमी पाण्यातही पर्ससीन बोटीनी धुमाकुळ घातल्याने पारंपारिक पध्दतीने मासेमारी कऱणारे स्थानिक मच्छिमार मासळी दुष्काळाच्या फेर्‍यात अडकले होते.त्याविरोधात मोठा संताप व्यक्त होत होता.अखेर सरकारने नवे परवाने न देण्याचा निर्णय घेतल्याने त्याचे स्वागत होत आहे.कोकणातील सात सागरी जिल्हयात 456 मासेमारी गावं असून 81 हजार 482 कुटुंबातील 3 लाख 86 हजार 259 लोकसंख्या मासेमारीवर अवलंबून आहे.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here