हिंगोली प्र. :- हिंगोली जिल्ह्यातील कोळसा येथील प्रसिद्ध यात्रेत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिले द्वारे कन्हैया खंडेलवाल – प्रतिनिधी आय.बी.एन लोकमत याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.
कन्हैया खंडेलवाल हे उपोषणार्थीना भेटण्यासाठी गेले असता परतत असताना यात्रेतील न्यूज बनवण्यासाठी काही फुटेज घेत होते या प्रसंगी यात्रेत खुला वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेनी हे आपलीच शूटिंग करण्यासाठी आले असल्याचा समज करून त्यांच्या वर शूटिंग दरम्यान पाठीमागून हल्ला चढवला. सुरवातीस दगडे फेकून मारली व नंतर त्यांना धक्का बुक्की करून कॅमेरा घेण्याचा प्रयत्न केला अशी माहीती प्रत्यक्षदर्शिनी दिली.
या वेळी यात्रेतील काही मंडळींनी मध्यस्ती करून त्यांना सोडवले.
पत्रकार संरक्षण कायदाचा मसुदा तयार झाला असल्याने ही बाब अत्यंत आनंदाची आहे परंतु सदरील कायदा हा अंमलात न आल्यामुळे लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ असलेले पत्रकारांवर सतत असे हल्ले सुरूच आहेत. सदरील कायदा तातडीने अंमलात आल्यास हल्लेखोरावर चोप बसेल असे सुज्ञ नागरिका कडून बोलले जात आहे.