३ डिसेंबर १९३९ रोजी मुंबईत मराठी पत्रकार परिषदेची स्थापना झाली.. परिषदेचे पहिले अध्यक्ष होते ज्ञानप़काशकार काकासाहेब लिमये.. आमचे पहिले अध्यक्ष कसे होते? त्यांची सवभाववैशिषटये याबाबत आपण सारेच अनभिज्ञ आहोत.. आचार्य प़. के. अत्रे, काकासाहेबांना गुरूस्थानी मानत.. काकासाहेबांच्या समृतीदिनानिमित्त आचार्य अत्रे यांनी मराठा मधून आदरांजली वाहिली होती.. तो लेख २८ एप़िल १९६९ च्या दैनिक मराठा प़सिध्द झाला होता.. तो येथे पुन:प़काशित करीत आहोत.. आज पत्रकारितेचे संदर्भ बदलले आहेत.. परंतू आमचे मराठी पत्रकार पत्रकारिता कशी जगत होते हे हा लेख वाचून समजू शकते..
कै. काकासाहेब लिम
आमने एक जेष्ठ आणि श्रेष्ठ स्नेही श्री. कृष्णाजी गणेश उर्फ काकासाहेब लिमये म्हणजे कोण? असा आजच्या तरुण पिढीला प्रश्न पडल्यास त्यांत कांहीच नवल नाहीं कारण काकासाहेब स्वतः कमालीचे प्रसिध्दिपराड; मुख होतें. फार काहीं जुनी गोष्ट नाही, पण तो काळ एक असा होता की, त्यावेळी पुण्यांत सूर्यप्रकाशाबरोबर ‘ज्ञानप्रकाश’ परोघरी आपल्या ज्ञानाचा प्रकाश पोहोचवित असे. कै. ना. गोपाळराव गोखले यांनी आपल्या काही निवडक पण एकनिष्ठ | सहकाऱ्यांसमवेत पुण्यांत स्थापन केलेल्या ‘भारत सेवक समाज’ या संस्थेचे ‘ज्ञानप्रकाश’ हे मराठी दैनिक मुखपत्र आणि त्या पत्राला लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावर नेऊन बसविणारे त्यांचे कार्यकुशल आणि सव्यसाची संपादक श्री. काकासाहेब लिमये एका प्रमुख दैनिकांचे संपादक या नात्याने प्रसिध्दि ही काकासाहेब यांच्या हातांतील एक सिध्दि होती. पण तिचा उपयोग त्यांनी स्वतःची टिमकी पिटण्याकडे केव्हांच केला नाही. आजच्या जमान्यांत हे थोडेसे चमत्कारिक वाटते खरे पण काकासाहेबांच्या बाबतींत वस्तुस्थितीच तशी होती. त्यामुळे कृ. ग. लिमये हे नांव ‘ज्ञानप्रकाश पत्राचे संपादक असलेल्या व्यक्तीचे आहे. याची सर्वसाधारण माहिती अनेकांना असली तरी ही कृ.ग. लिमये व्यक्ति कोण यांचा उलगडा फारच थोड्यांना होई. स्वत: अंधारांत राहून आपल्या
इतरांचे मार्गदर्शन करणाऱ्या एखाद्या टॉर्नचीच उपमा सार्थपणे काकासाहेबांच्या अजब प्रसिध्दिपण्ड; मुखतेला देता येईल.. त्या काळच्या ‘भाला ‘ या चरचरीत आणि चुणचुणीत साप्ताहिकाचे संपादक ‘भाला’ कार (भास्करराव) भोपटकर यांनी आपल्या पत्राच्या स्तंभांतून एकदां जाहिरव पृच्छा केली की, ‘ज्ञानप्रकाश’चे संपादक काकासाहेब लिमये म्हणून जे कोणी आहेत त्यांनी आपला फोटो तरी एक वेळ ‘ज्ञानप्रकाशांत’ छापावा म्हणजे हे काकासाहेब लिमये कोण हें तरी आम्हाला कळेल! काकासाहेबांनी ‘भाला’ कारांच्या या जाहिर आव्हनाचा स्विकार केला नाही ही गोष्ट अर्थातच निराळी. ज्ञानप्रकाश’च्या झोताने काकासाहेबांनी ज्या अनेक व्यक्तींना किंवा संस्थांना प्रसिध्दीच्या प्रकाशांत आणले त्यांत आमचा स्वतःचा समावेश आहे हे आम्ही कृतज्ञतेने नमूद करतो. किंबहुना आमच्या साहित्यिक, सार्वजनिक, आणि व्यावसायीक (पत्रकार म्हणून) जीवनाचा पाया खंबीरपणे भरण्यास ‘ज्ञानप्रकाश’ द्वारा काकासाहेबांनी केलेली आमची मुक्तकंठ प्रशस्ती आणि निःसंकोच प्रसिध्दिच बव्हंशी कारणीभूत झाली असे म्हणण्यास कांहीच प्रत्यवाय नाहीं व्यक्तिशः आमच्यावरील या काकासाहेबांच्या ऋणाचा आम्हाला कदापिही विसर पडणं शक्य नाही. ‘ज्ञानप्रकाश’चे संपादक या व्यवसायपरत्वे त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीतून | काकासाहेबांच्या उपकारांचे जे ओझे आमच्या | बाहूवर अवतरले त्याचा येथवर उल्लेख केला. पण व्यक्ति म्हणून काकासाहेबांच्या सोज्वळ | मार्गदर्शनाचा, प्रेमळ सहवासाचा, आत्मीय | अस्मितेचा आणि अविस्मरणीय स्नेहलतेचा जो लाभ आम्हांला झाला त्याचे वर्णन करणेही शक्य नाही. तसें पाहिल्यास व्यक्तिशः | काकासाहेब आणि आम्ही स्वतः यांच्यांत साम्य कमीच. आम्ही एकप्रकारे उच्छशृंखल. | काकासाहेब कमालीचे संयमी, आम्ही | अद्ययावत पाश्यात्य पोषाखांत वावरणारे,
काकासाहेब सदरा, लांब कोट, धोतर, काळी टोपी यांच्या पलिकडे न जाणारे, आम्ही भांडखोर, काकासाहेब प्रसंगी पडते घेऊनहि तंटा टाळणारे आम्ही बंडखोर, बंधनांना न जुमानणारे, काकासाहेब ‘सबूर’ वादी, आम्ही फटकळ, काकासाहेब मृदुभाषी, आम्हां उभयतात इतकी विसंगति असूनहि त्यांचा आमचा स्नेह अभेद्य आणि अतूट राहिला. ‘ज्ञानप्रकाश’ ज्या संस्थेचे मुखपत्र त्या भारत सेवक समाजाची राजकारणाकडे पाहण्याची दृष्टि ‘मवाळ’ किंवा ‘प्रागतिक’ ‘जहाल’ राजकारण तसे म्हटल्यास काकासाहेबांनाच मान्य नव्हते, परंतु विरोधासाठी म्हणूनच विरोध | ही ‘मवाळ’ दृष्टी त्यांनी काँग्रेसच्या विशेषतः | जहाल राजकारणाबाबत केव्हाहि अंगिकारली | नाही. परंतु खरे सांगवयाचे म्हणजे | काकासाहेबांना राजकारणापेक्षा समाजकारणांतच | अधिक रस वाटे. सनातनी वृत्तीचे आगर म्हणून त्याकाळी मानल्या गेलेल्या पंढरपूर | क्षेत्रांतील एक कुटुंबीय ही वस्तुस्थिति असतांही | काकासाहेब वृत्तीने खरेखुरे आणि मनोमन समाजसुधारक होते. अस्पृश्योध्दार, स्त्रीशिक्षण,
विधवाविवाह इत्यादी समाजसुधार चळवळींचा पुरस्कार ते केवळ ‘ज्ञानप्रकाश’ च्या रकान्यांतून करूनच थांबत नसत तर वेळप्रसंगी स्वतः पुढाकार घेऊन किंवा त्यांत समभागी होऊन त्यांना ते सक्रिय प्रोत्साहन देत. प्रिन्सिपॉल प्रल्हाद केशव अत्रे, बी.ए., बी. टी., टी. डी. (लंडन) या आमच्या मालगाडीवजा, लांबलचक नामाभिधानाचा हल्लीचा रूढ सुटसुटीत संक्षेप ‘आचार्य प्र. के. अत्रे’ करण्याचे श्रेय सर्वस्वी काकासाहेबांनाच आहे. |स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी
मराठी भाषेतून परकीय शब्दांना गचांडी देऊन त्यांच्या जागी निव्वळ मराठी शब्दांची योजना करण्याची मोहिम उघडली आणि काकासाहेबांनी हिरीरीने ती सक्रिय अंमलात आणण्याचा उपक्रम आरंभला. त्यांत आमच्या प्रिन्सिपॉलपदावर कुल्हाड पडली आणि आचार्य ही उपाधि आमच्या नावामागे कायमची चिकटली! काकासाहेब १९४८ साली | वारले. त्यापूर्वी सुमारे एक तपभर त्यांची आमची गट्टी टिकली. अत्रे-लिमये सख्य |म्हणजे अनेकांना पडलेले आणि त्यांना न | सुटलेले एक कोडेच! चमत्कृतिजन्य तर ते होतेंच. त्याच्या कुतूहलाने ज्या प्रमाणे अनेकांना मोहित केले त्याचप्रमाणे अनेकांना असूयाप्रेरितही केले. काकासाहेबांचा लोभ, त्यांचे प्रेम आणि त्यांची माया यामुळे आमचा स्वतःचा अपरंपार फायदा झाला. त्यांचा भातृतुल्य भाव आम्हास सदैव मार्गदर्शक ठरला. त्यांची आमच्यावरील माया सदैव आमच्या पाठीशी एक मोठी शक्ती म्हणून उभी राहिली. दुर्दैवानें आमचा जो लाभ तोच काकासाहेबांना हानिकारक ठरला. अत्रे लिमये गट्टीच काकासाहेबांच्या ‘ज्ञानप्रकाश’ संपादकीय निवृत्तीला (सक्तीच्या) निमित्त ठरली हे उपड गुपित आहे. काकासाहेबांनी मात्र आपल्या अंत्य घटकेपर्यन्त याची एकदाही कबुली दिली नाही. काकासाहेबांचा सर्वात थोरपणा कोणता असेल तर तो हाच होता की, आपल्या कट्ट्यातील कट्ट्या प्रतिस्पर्ध्याविरोधातही त्यांनी कधी दुर्भावना व्यक्त केली नाही की, त्याच्याबद्दल अनुदार, उद्गार काढले नाहीत. अंत:करणांत आग पेटली असतांना ही निर्विकार मुद्रेने ‘यांत काय झाले’ अशीच ते त्यावर सारवासारव करीत. काकासाहेब सहसा कर्धी भडकत नसत. पण
एकदा काय झाले. त्यांच्या एका सत्काराच्या सभेत आम्ही आमच्या नेहमीच्या पद्धतीने एक त्वेषपूर्ण विधान केले. आम्ही जे बोललो ते खोटं नव्हतेच. फक्त त्या विधानाने आमच्या म्हणण्याला धार दिली गेली. काकासाहेबांनी तेथेच जाहीर भाषणांत आपल्या सौम्य पध्दतीनं आमची हजेरी घेतली आणि सभा संपल्यानंतर त्यांनी आम्हाला चक्क बजावले की, आमची भावना योग्य असली तरी वापरलेली भाषा ठीक नव्हती. काकासाहेबांचे आणि आमचे विचार एकमेंकाना पटले नाहीत, असे कितीतरी प्रसंग सांगतां येतील. पण अशा या विचारसंघर्षाचे पर्यवसान त्यांची आमची मैत्री किंवा परस्पर प्रेमभाव यत्किंचितही दुरावण्यांत कधी झालें नाहीं. काकासाहेबांच्या हयातीत एक मराठी दैनिक काढण्याची आमची जिद्द अनेकदा आम्ही त्यांच्यापाशी व्यक्त केली आणि प्रत्येक वेळी काकासाहेबांनी ‘बाबूराव, त्या भानगडींत तुम्ही पडू नका’ असे सांगून आम्हास परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तरीही आम्ही ‘जय हिंद’ दैनिक काढले आणि त्यावेळी विकलांग स्थितीत रुग्णशय्येवर असलेल्या काकासाहेबांनाच त्याचा प्रथमांक अर्पण केला. तो अंक हातांत घेतल्यावर काकासाहेबांच्या डोळ्यातून वाहलेल्या अश्रुधारांची आठवण होऊन आजही आमचे हृदय कलकलते. दैनिक मराठ्याची आम्ही प्राणप्रतिष्ठा केली त्यावेळी काकासाहेब हयात नव्हते. पण आमची आजही मनोमन भावना आहे कीं, काकासाहेबांच्या आशीर्वादाखेरीज दैनिक मराठ्याला आजची लोकप्रियता, प्रतिष्ठा आणि भरभराट प्राप्त झालेली नाहीत. काकासाहेबांच्या पुण्यस्मृतीला दैनिक मराठा आणि काकासाहेबांचे अनेक चाहते यांच्या वतीने आमचे शतशः प्रणाम
आचार्य अत्रे