अ. भा. मराठी पत्रकार परिषद
राजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तर
दीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती

मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई विभागीय सचिवपदी ज्येष्ठ पत्रकार दीपक कैतके यांची तर मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी नवराष्ठ्र दैनिकाचे राजकीय संपादक राजा आदाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मराठी पत्रकार परिषदेच्या विस्तारित कार्यकारिणीच्या आज झालेल्या झुम बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष गजानन नाईक होते..
मराठी पत्रकार परिषद राज्यातील 35 जिल्हयात आणि 354 तालुक्यात कार्यरत आहे.राज्यात 8000 सदस्य संख्या असलेल परिषदेची मुंबईत नव्याने बांधणी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.त्याची जबाबदारी राजा आदाटे आणि दीपक कैतके यांच्यावर सोपविण्यात आली आहे.मुंबई शाखेचे अध्यक्ष लवकरच आपली कार्यकरिणी जाहीर करून शहरातील जास्तीत जास्त पत्रकारांना सदस्य करून घेण्याचा प्रयत्न करतील .
राजा आदाटे आणि दीपक कैतके हे दोघेही चळवळीशी नातं सांगणारे पत्रकार आहेत.राजा आदाटे आणि दीपक कैतके यांचं एस.एम.देशमुख तसेच किरण नाईक आणि अन्य पदाधिकारयांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिलया आहेत..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here