मुंबई :राज्यात कोरोनानं 135 पत्रकारांचे बळी गेले असले तरी दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबासाठी सरकार काहीच करीत नाही.. राजेश टोपे यांनी केलेली ५० लाख रूपयांची घोषणा केव्हाच इतिहास जमा झाली.. मात्र सरकार काही करीत नाही म्हणून रडत बसणे मराठी पत्रकार परिषदेला मान्य नाही.. जे परिषदे बरोबर आहेत याचा होते अशा दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी पत्रकारांचे हजारो हात पुढे येत आहेत ही अत्यंत दिलासादायक बातमी आहे.. यापुढे राज्यातील एकही पत्रकार एकाकी नाही किंवा निराधार नसेल.. हम है ना ची मोहिम आता हळूहळू राज्यात सर्वत्र सुरू होत आहे.. त्याचे स्वागत केले पाहिजे..
आजची दोन उदाहरणं देतो.. अंबाजोगाई येथील एका वाहिनीचे पत्रकार नंदकुमार पांचाळ यांचं कोरोनानं निधन झालं.. चणई सारख्या छोट्या गावात राहून पत्रकार म्हणून पांचाळ यांनी उल्लेखनीय काम केलं.. मात्र त्यांच्या आकस्मिक निधनानं सैरभैर झालेल्या पांचाळ कुटुंबियांना थोडा आधार देण्याचं काम मराठी पत्रकार परिषद, शाखा अंबाजोगाईने केले आहे.. सर्व पत्रकारांनी आपल्या एेपतीनुसार निधी दिला आणि जमा झालेले 51 हजार रूपये आज पांचाळ कुटुंबाकडे सुपूर्द केले.. डॉ. राजेश इंगोले आणि चणई गावचे सरपंच अनिल शिंदे यांच्या हस्ते हा निधी देण्यात आला.. बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष दत्ता अंबेकर आणि अंबाजोगाई शाखेचे अध्यक्ष गजानन मुडेगावकर यांनी याकामी पुढाकार घेतला.. त्यांचे आणि संपूर्ण अंबाजोगाई युनिटचे मनापासून आभार.. तुमच्या या कार्यामुळे परिषदेची प्रतिष्ठा अधिक वाढली आहे..
दुसरी सकारात्मक बातमी आहे राहुरीची.. खुडसरगाव येथे वास्तव्य करून असलेले पत्रकार कैलाश देढे यांचाही कोरोनानं बळी घेतला.. राहुरी तालुक्यातील सर्व पत्रकार एकत्र आले.. त्यांनी निधी जमा केला आणि 68,000 रूपयांचा निधी देढे कुटुंबियांकडे सुपूर्द केला.. मला माहिती आहे, हा निधी तुटपुंजा आणि आम्ही एकटे नाही आहोत, आपले पत्रकार बांधव आपल्या सोबत आहेत हा विश्वास पत्रकारांच्या मनात निर्माण करण्यासाठी हा निधी पुरेसा आहे.. राहुरीच्या तमाम पत्रकार मित्रांना धन्यवाद..
ज्या तालुक्यात अशा दुर्दैवी घटना घडल्या आहेत तेथील दिवंगत पत्रकारांच्या नातेवाईकांना अशाच स्वरूपाचेी मदत करण्यासाठी तालुका संघांनी पुढाकार घ्यावा ही विनंती
एस.एम.देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here