शाब्बास विजय गराडे
आम्हास आपला अभिनान आहे..
मुंबई : पत्रकार फक्त स्वतःसाठीच ऑक्सीजन किवा अन्य आरोग्य सुविधा मागतात असं नाही गरजेनुसार ते सामांन्य रूग्णांना देखील ऑक्सीजन पुरवठा करून त्यांना जीवदान देऊ शकतात हे बत्तीस शिराळा येथील विजय गराडे या तरूण पत्रकारानं दाखवून दिलंय
बत्तीस शिराळा हा तालुका दुर्गम भागात आहे.. कोणत्याच वैद्यकीय व्यवस्था नाहीत.. अशा वातावरणात कोरोना रूग्णांना जेवणाचा डबा, औषधी, अॅम्ब्युलन्सची सोय उपलब्ध करून देण्याचं काम विजय गराडे करीत आहेत.. या कार्यातून त्यांचा डॉक्टरांशी संपर्क आला आणि मग त्यांनी हाती घेतलेलं कार्य अधिक व्यापकपणे सुरू केलं.. आपल्या मांगले गावातील प्राथमिक आरोग्य केंद़ात ऑक्सीजन अभावी रूगणांचे हाल होत आहेत असं लक्षात आल्यानंतर कोणत्याही पुडारयांची मदत न घेता त्यांनी पाच ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध करून दिले. विजय सांगत होते. “ऑकसीजनची सोय झाल्याने किमान वीस रूगणांचे मला प्राण वाचविता आले” .. बत्तीस शिराळा तालुक्यात आणि मांगले परिसरात विजय गराडे यांचं काम देवदुतापेक्षी कमी नाही.. विजयाचा आम्हाला अभिमान आहे.. ते मराठी पत्रकार परिषदेच्या परिवारात आहेत आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.. हस्तीदंती मनोरयात बसून, अग़लेख माघारी घेण्याची लाचारी करीत फुकटचे सल्ले देणारया गिरीश कुबेर यांच्यापेक्षा विजय गराडे यांचं काम मोठं आणि लाख मोलाचं आहे.. विजय अभिनंदन..