मा.ना.श्री.उध्दवजी ठाकरे

मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

मंत्रालय,मुंबई

विषयः महाराष्ट्रातील सर्व वयोगटातील पत्रकारांना उत्तराखंडच्या धर्तीवर कोविड-19 ची लस देणेची विनंती .. तसेच कोरोनाने बळी गेलेल्या  महाराष्ट्रातील 78 पत्रकारांच्या नातेवाईकांना केंद्राच्या धर्तीवर पाच लाख रूपयांची आर्थिक मदत देणेबाबत विनंती 

महोदय,

कोरोना काळात राज्यातील पत्रकारांनी अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडली आहे.लोकांना जागरूक करण्याचेच काम पत्रकारांनी केले असे नाही तर प्रसंगी रस्त्यावर उतरून जनतेला आणि कोरोना बाधितांना मदत करण्याचे काम करत अनेक पत्रकारांनी फ्रंन्टलाईन वर्करची भूमिका पार पाडली आहे.पत्रकारांच्या या भूमिकेचा पंतप्रधानांनी ‘कोरोना योध्दे’ अशा शब्दात गौरव केलेला आहे.आपली सामाजिक जबाबदारी पार पाडताना राज्यातील जवळपास 800 पत्रकार कोरोना बाधित झाले.त्यातील 78 पत्रकारांचे बळी कोरोनानं घेतले आहेत.ज्यांचे बळी गेले अशा पत्रकारांचे कुटुंबं आज रस्त्यावर आली आहेत.अनेकांना कोणताच आधार उरलेला नाही.अशा स्थितीत सामाजिक बांधिलकी जपणार्‍या या पत्रकारांच्या कुटुबाला आर्थिक मदत करणे हे सरकारचं कर्तव्य आहे.आरोग्यमंत्री मा.राजेश टोपे यानी खामगाव येथील एका कार्यक्रमात कोरोनानं बळी गेलेल्या पत्रकारांच्या नातेवाईकांना पन्नास लाख रूपये देण्याची घोषणा केली होती.ती घोषणा प्रत्यक्षात आलेली नाही.आमची आपणास विनंती आहे की,पन्नास लाख नाही तर किमान पाच लाख रूपयांची मदत तरी दिवंगत पत्रकारांच्या नातेवाईकांना झाली पाहिजे.केंद्र सरकारने दिवंगत पत्रकारांच्या नातेवाईकांना पाच लाख रूपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा केलेली आहे.त्याच धर्थीवर महाराष्ट्रात देखील सरकारने आर्थिख मदत करावी अशी आमची विनंती आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत 40 ते 50 या वयोगटातील पत्रकार जास्त बाधित झाल्याचे आणि त्यातील काहींचे मृत्यू झाल्याचे वास्तव समोर आले आहे.हे लक्षात घेऊन उत्तराखंड सरकारने सर्व वयोगटातील पत्रकारांना तातडीने कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेतला आहे.आम्ही गेली महिनाभर सरकारकडे पाठपुरावा करतो आहोत की,सर्व वयोगटातील पत्रकारांना ही लस दिली जावी मात्र सरकार त्याबाबत काही निर्णय घेताना दिसत नाही.त्यामुळे तरूण पत्रकारांचे बळी जात आहेत.आमच्याकडे जी आकडेवारी उपलब्ध आहे त्यानुसार राज्यातील 78 पत्रकारांचे कोरोनाने बळी घेतले आहेत…800पेक्षा जास्त पत्रकार बाधित झाले आहेत.प्रत्यक्षात ही आकडेवारी यापेक्षा मोठी असू शकते..कारण अनेक घटना समोर आलेल्याही नाहीत..देशात सध्या 45 पेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांचे लशीकरण सुरू आहे.पत्रकार हे फ्रन्टलाईन वर्कर आहेत हे लक्षात घेऊन सर्व वयोगटातील पत्रकारांसाठी तातडीने लस उपलब्ध करून द्यावी आणि पत्रकारांचे प्राण वाचवावेत.यासाठी सरकारला फार वेगळे काही करावे लागणार नाही.तेव्हा हा निर्णय तातडीने घ्यावा अशी पुनश्‍च विनंती आहे..

आपल्याकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे.

कळावे

आपले 

      गजानन नाईक       किरण नाईक              एस.एम.देशमुख

      अध्यक्ष                   विश्‍वस्त                             मुख्य विश्‍वस्त 

    विजय जोशी        संजीव जोशी                      शरद पाबळे        

    कोषाध्यक्ष           सरचिटणीस                         कार्याध्यक्ष  

अनिल महाजन           जान्हवी पाटील                बापुसाहेब गोरे

राज्य प्रसिध्दी प्रमुख     राज्य महिला संघटक         सोशल मिडिया सेल  प्रमुक      

निवेदनाची प्रत

मा.ना.श्री.अजित पवार उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री

मा.ना.श्री राजेश टोपे,आरोग्य मंत्री 

मा.ना.श्रीमती आदिती तटकरे ,राज्यमंत्री माहिती व जनसंपर्क 

मा.श्री.दिलीप पांढरपट्टे महासंचालक माहिती व जनसंपर्क   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here