.
माहिती आणि जनसंपर्क विभागाचे संचालक अजय अंबेकर यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.31 मार्च रोजी ते सेवामुक्तही झाले .माहिती आणि जनसपंर्कची स्वेच्छा निवृत्तीची पंरपरा नाही.उलटपक्षी रितसर निवृत झाल्यानंतरही अनेक लटपटी-खटपटी करून मुदतवाढ मिळविण्याचीच या विभागाची ख्याती आहे..अंबेकर वेगळ्या पंथातले निघाले.वास्तवात अंबेकर यांना रितसर निवृत्तीसाठी आणखी किमान दोन वर्षे शिल्लक असताना त्यांनी सरकारी सेवेला रामराम ठोकल्याबद्दलची चर्चा विभागात ,माध्यम जगतात आहे..अजय अंबेकर यांनी स्वेच्छा निवृत्ती का घेतली ? माहिती नाही.त्यांच्याविरोधात काही चौकश्या सुरू आहेत ? की चौकश्या होऊ शकतात ? अशी त्यांना भिती होती ? माहिती नाही…मात्र सरकारच्या वेबसाईटवर अजय अंबेकर यांच्या स्वेच्छानिवृत्तीच्या निमित्तानं एक नोट प्रसिध्द झाली आहे.त्यात विधानसभा सदस्य श्री.ठाकरे यांनी अबेकर यांच्याविरोधात केलेल्या दोन तक्रारींचा उल्लेख आहे.माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या जाहिरातीमध्ये एस.टी.महामंडळाच्या दोन कंत्राटदारांनी केलेल्या गैरव्यवहार प्रकरणी एक तक्रार आहे तसेच शासनाची परवानगी न घेता बेसिल कंपनीच्या नियुक्तीबाबतची एक तक्रार आहे.या प्रकरणी अंबेकर यांना जबाबदार ध़रून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ठाकरे यांनी केल्याचा उल्लेख या नोटमध्ये आहे.शिवाय विशेषाधिकार भंगाच्या प्रकरणी देखील त्यांच्याविरोधात शासनास तक्रार करण्यात आलेली आहे. या तक्रारींची चौकशी प्राथमिक स्तरावर असताना देखील सरकारने त्यांच्या स्वेच्छा निवृत्तीस मंजुरी दिलेली आहे.मात्र या प्रकरणी अजय अंबेकर दोषी आढळल्यास त्यांच्या विरोधात नियमानुसार कारवाई करण्यास बाधा येणार नाही असेही या नोटमध्ये म्हटलेले आहे..

अजय अंबेकर अगोदर सीएमओत होते..तक्रारीवरून ते नंतर सास्कृतिक विभागात गेले.तेथून ते परत मुळ विभागात म्हणजे माहिती जनसंपर्कला आले.अजय अंबेकर यांनी पदावर असताना कायम पत्रकारांच्या अडवणुकीचे धोरण अवलंबिलेले होते.पत्रकार सन्मान योजनेचे जे काहूर माजले आहे त्यामागे अबेकरांची मोठी भूमिका होती अशी चर्चा आहे.तांत्रिक मुद्दे उपस्थित करून अनेक पत्रकारांचे अर्ज नाकारण्याचं ‘कर्तृत्व’ त्यांनी गाजविलेलं आहे.पत्रकारांना त्रास देऊन त्यांना सरकारच्या अंगावर सोडण्याची अंबेकर यांचा यामागे हेतू होता असेही बोलले जात असे..त्यांचा इस्त्रायल दौरा देखील तेव्हा चांगला चर्चेचा आणि वादाचा विषय ठरला होता.पत्रकार आणि माहिती विभागात दुरावा निर्माण करण्यात जे काही अधिकारी जबाबदार होते त्यात अजय अंबेकर यांचा देखील मोठाच वाटा होता..हे मी स्वअनुभवाने सांगू शकतो..

अजय अंबेकरांचा पुढील प्रकल्प काय आहे माहिती नाही..मात्र त्यांना माझ्या शुभेच्छा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here