पत्रकारांना  धक्काबुक्की…….

0
1127

उस्मानाबाद – पत्रकारांना धक्काबुक्की आणि अरेरावीची भाषा वापरणारा महेश मोतेवार याचा खासगी सुरक्षा रक्षक शहानूर काझी याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे उस्मानाबाद जिल्हा निमंत्रक सुनील ढेपे यांनी केली असून,या घटनेचा तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
समृध्द जीवन या चिटफंड कंपनीचा मालक महेश मोतेवार हा एका गुन्ह्यात उस्मानाबाद पोलीसाच्या ताब्यात आहे.मोतेवार यांनी छातीत दु:खत असल्याचे नाटक केल्यामुळे त्यास उस्मानाबादच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.गुरूवारी सकाळी त्यास सोलापूरला हलवण्यात येत होते,तेव्हा उस्मानाबाद शहरातील टीव्ही आणि वृत्तपत्राचे पत्रकार न्यूज कव्हर करण्यासाठी रूग्णालयाच्या आवारात थांबले असता,महेश मोतेवार यास आयसीयुमधून अ‍ॅम्बुलन्समध्ये नेत असताना न्यूज चॅनलच्या कॅमेरामननी शुटींग सुरू केली,तेव्हा मोतेवारचा खासगी सुरक्षा रक्षक शहानूर काझी (वय – २७, रा.बिबेवाडी,पुणे) हा झी २४ तासचे रिपोर्टर महेश पोतदार आणि टीव्ही ९ चे रिपोर्टर संतोष जाधव यांना धक्काबुक्की करून अरेरावीची भाषा वापरली.त्यानंतर पोतदार यांनी काझी यास पकडून उस्मानाबाद शहर पोलीसांच्या ताब्यात दिले.त्यानंतर पोतदार आणि जाधव यांच्या तक्रारीवरून शहानूर काझी याच्याविरूध्द उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात ३२३,५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्रकारांना झालेल्या धक्काबुक्की आणि अरेरावीचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने तिव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.त्याचबरोबर पोलीस अधीक्षक आणि गृह राज्यमंत्री यांना निवेदन पाठवून काझी याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here