दिनू ऱणदिवेंना 91 हजारांची थैली देणार,ठाण्यात पत्रकार दिनी सत्कार

0
798

सामनाचे संपादक उध्दव ठाकरे यांच्या हस्ते पत्रकारांचा गौरव

मुंबई दिनांक 26 डिसेंबर ( प्रतिनिधी) वयोवृध्द पत्रकार श्री.दिनू रणदिवे यांना मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन पत्रकार दिनी म्हणजे 6 जानेवारी रोजी सन्मानित करण्यात येत आहे.सामनाचे संपादक श्री.उध्दव ठाकरे यांच्या शुभहस्ते दिनू रणदिवे यांचा तसेच अन्य ज्येष्ठ पत्रकारांचा विविध पुरस्कारांनी गौरव केला जाणार आहे.दिनू रणदिवे यांनी नुकतेच वयाच्या 91 व्या वर्षात पदार्पण केले आहे,त्याबद्दल 91 हजारांची थैली अर्पण करून त्यांच्या पत्रकारितेतील उत्तुंग कार्याबद्ल कतज्ञता व्यक्त केली जाणार आहे.मानपत्र आणि स्मृती चिन्हही यावेळी त्यांना श्री.उध्दव ठाकरे यांच्या हस्ते अर्पण करण्यात येणार आहेे. ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये दुपारी बारा वाजता होणार्‍या याराज्यस्तरीय पत्रकार दिन सोहळ्यास  ठाण्याचे पालकमंत्री श्री.एकनाथरावजी शिंदे,महापौर श्री. संजय मोरे आणि ज्येष्ठ पत्रकार अरूण टिकेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.ठाणे जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन कऱण्यात आले असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख  प्रसिध्दी दिलेल्या पत्रकात देण्यात आली आहे.

पत्रकार दिनाच्या या सोहळ्यात महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकारांचा विविध पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे.त्यामध्ये चंद्रमोहन पुपाला( दर्पणकाळ बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार),श्री.अरूण खोरे ( आचार्य अत्रे पुरस्कार )श्री.मोरेश्‍वर बडगे( गं।त्र्यं.माडखोलकर पुरस्कार ) कमलेश सुतार ( पा.वा.गाडगीळ पुरस्कार )श्रीमती प्रणाली कापसे ( सावित्रीबाई फुले पुरस्कार) तुषार खरात( स्व.प्रमोद भागवत शोध पत्रकारिता पुरस्कार ),सुनील ढेपे ( नागोरावजी दुधगावकर पुरस्कार ) वसंतराव कुलकर्णी ( भगवंतराव इंगळे स्मृती पुरस्कार ) विकास महाडिक ( दत्ताजीराव तटकरे स्मृती पुरस्कार ) आणि ठाणे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने जिल्हयातील ज्येष्ठ पत्रकारास दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार सुधीर कोर्‍हाळे यांना देण्यात येत आहे. तर उत्कृष्ट जिल्हा पत्रकार संघासाठी दिला जाणारा रंगाण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार यंदा भंडारा जिल्हयास दिला जात आहे.रोख रक्कम ,मानपत्र,शाल,श्रीफळ असे पुरस्कारांचे स्वरूप आहे. दुपारी बारा वाजता हा कार्यक्रम होत आहे.
तत्पुर्वी सकाळी साडेदहा वाजता दुष्काळ आणि माध्यमांची भूमिका या विषयावर परिसंवाद होत आहे.यामध्ये ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर कुलकर्णी,अमर हबिब,नितीन केळकर (वृत्त संपादक आकाशावाणी पुणे )हे आपली मंतं मांडतील तर देवेंद्र भुजबळ ( संचालक माहिती आणि जनसंपर्क विभाग मंत्रालय,मुंबई ) हे शासनाची बाजू माडतील.यावेळी श्यामसुंदर सोन्नर दुष्काळावरील आपल्या कवितांचं सादरीकऱण करतील.या कार्यक्रमास सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक,कार्याध्यक्ष सिध्दार्थ शर्मा,सरचिटणीस यशवंत पवार,कोषाध्यक्ष मिलिंद अष्टीवकर,ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे,उपाध्यक्ष तुषार राजे,विकास महाडिक,सरचिटणीस नारायण शेट्टी,श्रीकांत आडे,कोषाध्यक्ष मिलिंद लिमये आणि राहूल लोंढे ,ठाणे शहर पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष विकास काटे,सरचिटणीस दिलीप शिंदे,आणि कोषाध्यक्ष कपिल राऊत यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here