जिल्ह मामाहिती अधिकारी आणि पाच पदे रिक्त
परभणी जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा माहिती अधिकारी पद भरण्याची मागणी
परभणी(प्रतिनिधी)दि.25ः- परभणी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातील जिल्हा माहिती अधिकारी या मुख्य पदासह पाच महत्वाचे पदे रिक्त झाल्याने पत्रकारांचे अनेक प्रश्न रेगाळत पडले आहे. ही पदे ताबडतोब भरण्याची मागणी परभणी जिल्हा पत्रकार संघाने आज जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात परभणी जिल्हा पत्रकार संघाचे एक शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांना भेटले. त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परभणी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातील जिल्हा माहिती अधिकारी, दोन सहाय्यक माहिती अधिकारी, दोन लिपिक असे पाच पदे रिक्त आहेत. सध्या परभणी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून औरंगाबाद येथील प्रमोद धोगडे यांना प्रभारी नेमले आहे. परंतू ते औरंगाबादेत असतात. परभणीत फिरकले नाही. या कार्यालयातील इतर जागाही रिक्त आहेत. कार्यालय केवळ दोन लिपिकांवर चालत आहे त्यामुळे पत्रकारांचे अनेक प्रश्न रेंगाळत पडले आहे. अधिस्विकृतीची प्रकरणे प्रलंबीत आहेत. याशिवाय शासनाच्या अनेक योजना पत्रकारांपर्यंत पोहचत नाहीत, आरोग्यदायी योजनेचे प्रस्ताव भरून घेतलेले नाहीत. वृत्तमानपत्रांचे जाहिरात बिले प्रलंबीत आहेत आणि विशेष म्हणजेच शासनाच्या विविध योजना व उपक्रमांचे प्रसिध्दी नोटसही बंद झाल्या आहेत. त्यामुळे या कार्यालयाचे काम जवळपास ठप्प आहे. तरी मा.जिल्हाधिकाऱ्यांनी ही पदे भरण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करावे, अशी मागणी परभणी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राचार्य सुरेश नाईकवाडे, कार्याध्यक्ष सुरज कदम, प्रविण देशपांडे, राजु हट्टेकर, प्रभू दिपके, लक्ष्मण मानोलीकर, मोईन खान, शेख इफतेखार, धाराजी भुसारे, उत्तम बोरसुरीकर, दिलीप बोरूळ, दिलीप बनकर, शैलेश डहाळे, विश्वंभर आदी उपस्थित होते.