काय चाललंय हे कोकणात ?
कोकणच्या पुणयभूमीत अनेक महापुरूष जन्माला आले.. आपले अफाट कर्तृत्व आणि अलोकीक बुधदीमततेचया बळावर या महापुरूषांनी कोकणचा झेंडा आणि दबदबा जगभर निमा॓ण केला.. जीवनाचं असं एकही क्षेत्र नाही की, ज्यामध्ये कोकणच्या नररत्नांनी कोकणचा नावलौकिक वाढविला नाही… त्यामुळं मला कोकणाचं नेहमीच अप़ुप वाटत आलेलं आहे.. कोकणची भूमी केवळ निसर्गरम्यच आहे असं नाही तर या भूमीला कर्तृत्व आणि बुद्धीमततेची देखील देणगी आहे.. अशा स्थितीत कोकणातून येणारया बातम्या कोकणच्या नावलौकिकाला बदनाम करणारया आहेत असंच खेदानं म्हणावं लागेल.. काही दिवसांपूर्वी एका आमदारानं पत्रकाराच्या कानशिलात लगावली तर आज दुसरया एका आमदारानं इंजिनिअरचया अंगावर चिखल फेकून दहशत बसविण्याचा प़यतन केला.. पत्रकाराला मारहाण करणारया आमदाराच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतरही काहीच कारवाई झाली नाही.. तव्दतच चिखलफेक करणारया आमदाराचंही काहीच होणार नाही हे उघड आहे.. पत्रकार, अधिकार्यांना मारहाण केवळ दहशत निर्माण करण्यासाठी केली जाते.. लोकहित वगैरेशी त्याचा काही संबंध नसतो.. मुंबई – गोवा महामार्ग हे जुनं दुखणं आहे.. या मागाॅवर दररोज रक्ताचा सडा सांडायचा.. त्याविरोधात पत्रकारांनी माझ्या नेतृत्वाखाली एल्गार पुकारला तेव्हा सारे राजकीय शेंदाडशिपाई गप्प गार होते.. आज काम सुरू होतंय म्हटल्यावर सारयांनाच जोर बैठकांना सुरूवात केलीय… महामार्गाचं काम रेंगाळलं आहे आणि निकृष्ठही होतंय यात वाद नाही.पण याला कारणीभूत आहे ती राजकीय टककेबाजी… त्यामुळं एका अधिकरयांचया अंगावर चिखलफेक करून हा प्रश्न सुटणार नाही तर ज्यांचे ज्यांचे हात भ्रष्टाचारानं बरबटले आहेत.. त्यांना नागडं केलं पाहिजे.. ते होत नाही कारण सवॅपक्षीय मिलीभगत आहे.. एकमेकांना पाठिशी घालणारे विकासाच्या प्रश्नावर एक आलेत आणि देवभूमीचया विकासासाठी काही करताहेत असं कधीच दिसलं नाही.. कायदा हातात घेणारया समोर कायदा हतबल आहे.. आता लोकांनीच कोकणात फोफावलेलया गुंडगिरीचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे..