मुरूड जंजिर्याच्या समुद्रात असलेल्या पद्मदुर्ग किल्ल्यावरील 60 किलो वजनाची पोलादी तोफ चोरीस गेल्याने खळबळ उडाली असून इतिहासप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे..या तोफेची किंमत काही लाखात असल्याचे सांगितले जाते.पुरातत्व विभागाचे निरिक्षक शैलेंद्र कांबळे यांनी यासंबंधीची तक्रार मुरूड पोलिसात दिली आहे.पद्मदुर्ग हा किल्ला जंजिर्यापासून वायव्येस तीन किलो मिटर अंतरावर असून 1693 मध्ये या किल्ल्याचे बांधकाम झाले आहे.’कासाचा किल्ला’ म्हणूनही हा किल्ला ओळखला जातो.या किल्ल्यावर जाण्याची व्यवस्था नसल्याने किल्ल्यावर वर्दळ नसते याचा फायदा घेत चोरट्यानं चोरी केली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.-पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळेच ही चोरी झाल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.