निवेदन : पिण्याच्या पाण्यासाठी लढा
कोपरगाव : शहरात पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली आहे. नळाला १२ दिवसाआड गाळ मिश्रीत, अळ्यायुक्त व अशुध्द पाणी पुरवठा केला जात आहे. म्हणून गुरूवारी तालुका मराठी पत्रकार संघातर्फे लोकसभा निवडणूकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला.
शहराच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ऐन उन्हाळ्यात नळांना १२ दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे. या अनुषंगाने आज पत्रकार संघाच्या बैठकीत गोदावरीस २७ एप्रिल पुर्वी पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडावे, ३ व ४ नंबर तळ्यातील गाळ त्वरीत काढावा, नवीन ५ नंबर तळ्याचे खोदकाम सुरू करावे, अशा मागण्या मांडण्यात आल्या. तसे न झाल्यास शिर्डी लोकसभा निवडणूकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचे निवेदन तहसीलदार योगेश चंद्रे यांना देण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष युसूफ रंगरेज, उपाध्यक्ष शैलेश शिंदे, अरूण आहेर, मोबीन शेख, संतोष जाधव, दीपक जाधव, योगेश डोखे, संजय लाड, अनिल दिक्षीत, हेमचंद्र भवर, सिध्दार्थ मेहेरखांब, रोहित टेके, शाम गवंडी, पुंडलिक नवघरे, हाफीज शेख, निवृत्ती शिंदे, अक्षय काळे आदी उपस्थित होते.