माजी आमदार माणिकराव जगताप यांचे प्रतिपादन
मुंबई – गोवा महामार्गाचं चौपदरीकरण व्हावं यासाठी कोकणातील पत्रकारांनी सलग सहा वर्षे आंदोलनं केली.. एखादा समाजहिताची प़शन हाती घेऊन त्यासाठी सतत सहा वर्षे पत्रकारांनी संघर्ष केल्याचं राज्यात तरी दुसरं ऊदाहरण नाही.अखेर पत्रकारांच्या या लढ्याला यश आलं आणि या रस्त्याचं श्रेय लाटण्यासाठी अनेक राजकीय डोंबकावळे सरसावले. ‘आमच्यामुळंच रस्त्याचं चौपदरीकरण होतंय’ म्हणत श्रेय लाटण्यासाठी राजकारण्यांमध्ये अहमहमिका सुरू झाली. यावर कोणताच पत्रकार प्रतिवाद करीत नव्हता कारण त्यांची चळवळ श्रेयासाठी नव्हती.. रस्यावर होणारे अपघात थांबवावेत आणि कोकणच्या रखडलेल्या विकासाचा महामार्ग सुरू व्हावा ही पत्रकारांची भूमिका होती.. मात्र ज्यांनी पत्रकारांच्या बाजुनं कधी पत्रक काढलं नाही, पत्रकारांना कधी पाठिंबा दिला नाही. उलट लेखण्या म्यान करून आता रस्त्यावर उतरायला लागले, हे काय पत्रकारांचं काम आहे काय? अशा शब्दात काहींनी टिंगल केली.तेच आज श्रेय लाटण्याच्या स्पर्धेत सर्वात पुढे आहेत. पत्रकारांचा निधाॅर पक्का होता.. एकजूट होती त्यामुळंच लढा यशस्वी झाला..रायगड प्रेस क्लबच्या रविवारी महाडमध्ये झालेल्या काय॓क़मात कॉग्रेसचे नेते, माजी आमदार माणिक जगताप यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रश्न केवळ आणि केवळ पत्रकारांमुळेच मागीॅ लागल्याचं नि :संदिग्ध शब्दात सांगितलं.. एस.एम.देशमुख यांनी कोकणातील पत्रकारांना एकत्र केले, त्यांचे नेतृत्व केले आणि कोकणच्या हिताचा एक अनोखा लढा उभा केला..आज रस्त्याचं ८० टक्के काम होत आलं आहे.. त्याचं सवॅसवी श्रेय एस. एम.देशमुख आणि कोकणातील पत्रकारांना आहे.. असंही त्यानी स्पष्ट केले.. माणिकराव धन्यवाद… पत्रकारांनी केलेल्या कामाचं श्रेय त्यांना देऊन त्यांचं कौतूक करणारे आपण कोकणातील पहिले नेते आहात. .. रस्त्याचं काम आता लवकर पूर्ण व्हावं यासाठी दक्ष राहणं हे आता सर्वाचं कर्तव्य आहे.मुंबई-गोवा महामार्गासाठी पत्रकारांनी केलेलं आंदोलन हे राज्यातील पत्रकार हे सामाजिक बांधिलकीशी किती कटिबध्द आहेत याचे निदर्शक आहे हे नक्की.हा लढा पाहून राज्यातील अनेक पत्रकारांनी जनतेच्या बुनियादी प्रश्नांसाठी लढे उभारले आहेत.जेव्हा प्रशासन सुस्त असते,जेव्हा राजकारणी सत्तेच्या नशेत असतात आणि जेव्हा यंत्रणा बथ्थड झालेली असते आणि जेव्हा जनतेला कोणी वाली नसतो तेव्हा पत्रकार जनतेचा आवाज बनून पुढे येतात आणि आपलं उत्तरदायीत्व प्रामाणिकपणे पार पाडतात.मुंबई-गोवा महामार्गाच्या लढयाच्या वेळेस हे दिसले.