एसेम,किऱण नाईकांवर ‘लेडी जासुस’ची नजर

0
845
मुंबईतील एका  कथित पत्रकार महिलेने एस.एम.आणि किरण नाईक याच्या विरोधात हेरगिरी सुरू केल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.या बाईंनी आज किमान दोन जिल्हयातील पत्रकारांना फोन करून तुमच्या जिल्हयात एस.एम. आणि किरण नाईक यांच्या विरोधात काही गुन्हे दाखल आहेत काय? त्यांच्या अन्य काही भानगडी आहेत काय? याची चौकशी केली पण अपेक्षेप्रमाणे त्यांच्या हाती काही लागलेले नाही.
आपण एका आतंराराष्ट्रीय पत्रकार  संघटनेच्या पदाधिकारी असल्याचा थापा मारणार्‍या या बाईंची माहिती आणि जनसंपर्कमधील एका वरिष्ठ अधिकार्‍याकडे उठबस असते.त्यांच्या सल्ल्यानुसारच या बाईने ही हेरगिरी  सुरू केली असल्याची माहिती मिळाली आहे.एस.एम.देशमुख आणि किरण नाईक यांनी पत्रकारांच्या हिताचे अनेक प्रकल्प राबविले असून पत्रकारांना आपले हक्क मिळवून देण्यासाठी त्याचा लढा सुरू आहे.त्यामुळे माहिती आणि जनसंपर्कमधील काही अधिकार्‍यांचे हितसंबंध दुखावले असल्याने एसेम,नाईक यांना कुठे अडकविता येतील याची चाचपणी केली जात आहे.
दोघेही चळवळीतले पत्रकार असल्याने त्यांच्या विरोधात आंदोलन किंवा संघटनांत्मकबाबीतून गुन्हे दाखल झाले असू शकतात हा अंदाज करून असे काही जुने-पुराने खटले असतील तर त्याचे भांडवल करून उभयतांना बदनाम करण्याचे षडयंत्र काही अधिकारी रचत असल्याचा सुगावा बेरकयाला लागला आहे.एसेम यांची स्वच्छ प्रतिमा जर मलिन करता आली तर त्याचा त्यांच्या चळवळीवर परिणाम होईल आणि त्यांनी मोठ्या कष्टानं उभी केलेली पत्रकारांची चळवळही मोडून काढता येईल असा या अधिकारी आणि हितसंबंधीयांचा प्रयत्न आहे.त्यामुळे अधिकारी आणि हितसंबंधीयांच्यावतीने जासुसी कऱणार्‍या या बंडलबाज बाईपासून पत्रकारांनी सावध राहावे असे आवाहन आम्ही करीत आहोत.एसेम देशमुख पत्रकारांच्या हक्कासाठी सर्वस्वाचा त्याग करून लढत असल्याने त्यांच्या विरोधातले कोणतेही षडयंत्र हाणून पाडण्याचा प्रयत्न बेरक्या करीत राहणार आहे.
,महाराष्ट्रात पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना छळण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत.अशा जाचाला कंटाळूनच पुण्यात एका पत्रकाराने जाळून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.आता पत्रकारांचे आशास्थान असलेल्या एस.एम. यांच्या विरोधात वरिष्ठ पातळीवरून षडयंत्र रेचले  जात असल्याने अधिकार्‍याना पत्रकार संघटीत झालेले पहावत नाही हे पुन्हा स्पष्ट झाले आहे
बेरक्या आणि महाराष्ट्रातील तमाम पत्रकार एसेम यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहोत हे कटकर्‍यांनी लक्षात ठेवावे.
                                                        ———————————————————————————
                                                                                     खोप्या पोलिसांना भिक घालणार नाही–एसेम

मुंबईतील एक कथित महिला पत्रकार एसेम आणि किरण नाईक यांना बदनाम कऱण्यासाठी त्यांच्या विरोधात काही मटेरियल मिळते का याचा शोध जिल्हयाजिल्हयात फोन करून घेत असल्याची” बातमी आज बेरक्यानं पोस्ट केली आहे.ही बातमी वाचून धक्का बसला,निराशही झालो.मात्र दिवसभर राज्यभरातून अक्षऱशः शेकडो हितचिंतक पत्रकार मित्रांनी फोन करून अथवा व्हॉटस् अ‍ॅपवरून ” चिंता करू नका आम्ही आपल्यासोबत असल्याचा” दिलासा दिला.त्याबद्दल सर्व मित्रांचे मनापासून आभार व्यक्त करतो.बेरक्यानंही खंबीरपणे पाठिशी उभं राहायचं आश्‍वासन दिलं त्याबद्दल बेरक्याचेंही आभार.
पत्रकारांच्या हक्काची लढाई मी लढतो आहे.त्यासाठी 19 वर्षाच्या नोकरीवर आणि एक लाख रूपयांच्या पगारावर मी पाणी सोडले आणि त्यानंतर नोकरीसाठी कुठेही प्रयत्न केले नाहीत.सुदैवानं माझ्या घरची परिस्थिती बरी असल्यानं चळवळीसाठी जो खर्च लागतो तो सारा मी माझ्या खिश्यातून करतो आहे..त्यामुळे कोणी कितीही जासुसी केली तरी हाती काही लागणार नाही.परंतू बदनाम करण्यासाठी जो मार्ग अवलंबिला जात आहे ते पाहून नैराश्य तर नक्कीच येते.मात्र आपण सारे माझ्या पाठिशी असल्याचा मोठा दिलासा दिवसभरात मिळाल्यानं नैराश्य झटकून मी पुर्वीच्याच जिद्दीनं काम करीत राहणार आहे.अन अशा कोणत्याही षडयंत्रांना भिक घालणार नाही.एक तर मलाही कळते की,ज्यांचे हितसंबंध माझ्यामुळं धोक्यात आलेले आहेत अशी मंडळी माझ्याविरोधात कारस्थानं ही करीत राहणारच.अशा सर्व कारस्थानांना तोंड देण्याची माझी तयारी आहे.कारण कारस्थानं करणारी मंडळी काचेच्या घरात राहणारी आहे आणि माझ्या घराच्या भिंती मातीच्या आहेत. शिवाय मला काही मिळवायचं नाही आणि गमविण्यासारखं माझ्याजवळ आता काही नाही.एक नोकरी होती ती केव्हाच गमवून बसलो आहे.त्यामुळं मला भय नाही. आयुष्यात असे अनेक धक्के पचविले असल्यानं मी मनानं खंबीर आणि निर्भय झालेलो आहे.शिवाय हाती घेतलेले काम अर्धवट सोडून पळून जाण्याचा माझा स्वभाव नाही.अडचणी तर असंख्य आहेत तरीही माझी लढाई विजयी होईपर्यंत निर्धारानं मी लढत राहणार आहे.त्यात कोणी कितीही व्यत्यय आणला तरी मी त्याला भिक घाळणार नाही.
राहिला प्रश्‍न माझ्यावरील गुन्हयांचा.चळवळी करणारांसाठी दाखल झालेले गुन्हे ही आभूषणं असतात.जनहिताचे लढे लढताना,संघटना चालवताना माझ्यावर किती आणि कोठे कोठे गुन्हे दाखल झालेत याची जर माहिती कुणाला हवी असेल तर त्यांनी ती मला विचारावी ना,, त्यासाठी जासुसी करून आपला वेळ वाया घालविण्याची काहीच गरज नाही.मी सारी माहिती द्यायला तयार आहे.धन्यवाद.
आपल्या सर्वांचा
एसेम

“मुंबईतील एक कथित महिला पत्रकार एसेम आणि किरण नाईक यांना बदनाम कऱण्यासाठी त्यांच्या विरोधात काही मटेरियल मिळते का याचा शोध जिल्हया जिल्हयात फोन करून घेत असल्याची” बातमी आज बेरक्यानं पोस्ट केली आहे.ही बातमी वाचून धक्का बसला,निराशही झालो.मात्र दिवसभर राज्यभरातून अक्षऱशः शेकडो हितचिंतक पत्रकार मित्रांनी फोन करून अथवा व्हॉटस् अ‍ॅपवरून ” चिंता करू नका आम्ही  आपल्यासोबत असल्याचा” दिलासा दिला.त्याबद्दल सर्व मित्रांचे मनापासून आभार व्यक्त करतो.

पत्रकारांच्या  हक्काची लढाई मी लढतो आहे.त्यासाठी 19 वर्षाच्या नोकरीवर आणि एक लाख रूपयांच्या पगारावर मी पाणी सोडले आणि त्यानंतर नोकरीसाठी कुठेही प्रयत्न केले नाहीत.सुदैवानं माझ्या घरची परिस्थिती बरी असल्यानं चळवळीसाठी जो खर्च लागतो तो सारा मी माझ्या  खिश्यातून करतो आहे. चळवळीसाठी एसेम यानी दहा रूपये मागितल्याचे जरी उभ्या महाराष्ट्रात कोणी म्हटले तरी  मी  सारं सोडून गावाकडं जाऊन बसायची तयार  आहे.त्यामुळे कोणी कितीही जासुसी केली तरी हाती काही लागणार नाही.परंतू बदनाम करण्यासाठी जो मार्ग अवलंबिला जात आहे ते पाहून नैराश्य तर नक्कीच येते.मात्र आपण सारे माझ्या पाठिशी असल्याचा मोठा दिलासा दिवसभरात मिळाल्यानं नैराश्य झटकून मी पुर्वीच्याच जिद्दीनं काम करीत राहणार आहे.अन अशा कोणत्याही षडयंत्रांना भिक घालणार नाही.एक तर मलाही कळते की,ज्यांचे हितसंबंध माझ्यामुळं धोक्यात आलेले आहेत अशी मंडळी माझ्याविरोधात कारस्थानं ही करीत राहणारच.अशा सर्व कारस्थानांना तोंड देण्याची माझी तयारी आहे.कारण कारस्थानं करणारी मंडळी काचेच्या घरात राहणारी आहे आणि माझ्या घराच्या भिंती मातीच्या आहेत त्यामुळं मला भय नाही. आयुष्यात असे अनेक धक्के पचविले असल्यानं मी मनानं खंबीर आणि निर्भय झालेलो आहे.शिवाय हाती घेतलेले काम अर्धवट सोडून पळून जाण्याचा माझा स्वभाव नसल्यानंच रायगडमध्ये ‘एस.एम. म्हणजेच सक्सेसफुल मॅन’ असं मला म्हटलं जायचं.अनेक अडचणी असल्या तरी तीच हिमंत आजही माझ्यात आहेत.त्यामुळे मी कुणाला भिक घालणार नाही हे आमच्या जासुस भगिनीनं लक्षात ठेवावं.

राहिला प्रश्‍न माझ्यावरील गुन्हयांचा.चळवळी करणारांसाठी दाखल झालेले गुन्हे ही आभूषणं असतात.जनहिताचे लढे लढताना,संघटना चालवताना माझ्यावर किती आणि कोठे कोठे गुन्हे दाखल झालेत याची जर माहिती कुणाला हवी असेल तर त्यांनी ती मला विचारावी ना,, त्यासाठी जासुसी करून आपला वेळ वाया घालविण्याची काहीच गरज नाही.मी सारी माहिती द्यायला तयार आहे.धन्यवाद.

आपल्या सर्वांचा

एसेम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here