नेरळ-माथेरान मिनी टॅेनला सतत होणार्या अपघातांची नेमकी कारणं शोधण्यासाठी मध्य रेल्वेने आता या मार्गावरी सीसीटीव्ही कॅमेर्याची नजर ठेवायला सुरूवात केली आहे.तासी वेगाचे बंधन चालक पाळत नसल्याने किंवा रेल्वे रूळ बदलले न गेल्याने हे अपघात होतात का याचाही सीसीटीव्हीच्या माध्यमातून अभ्यास केला जाणार आहे.नेरळ-माथेरान दरम्यानचा प्रवास सुरूक्षित व्हावा यासाठी मध्य रेल्वने अनेक बदल केले आहेत.वाफेच्या इंजिन ऐवजी डिझेल इंजिन आणले गेले,मानवी ब्रेकवर चालणारी प्रणाली बदलून एअर ब्रेक प्रणाली विकसित केली गेली,सात नवे इंजिन्स आणले गेले तरीही गेल्या वर्षभरात किमान पाच वेळा रेल्वेचे डबे पटरीवरून उतरण्याच्या घटना घडल्या गेल्या.रेल्वे वेळापत्रकही विस्कळीत होत असल्याने हे सारं कश्यामुळं होतंय हे शोधण्यासाठी मार्गावर कॅमरे नजर ठेवणार आहेत.नेरळ येथून सुटणार्या प्रत्येक गाडीवर गाडीवर इंजिन आणि प्रत्येक बोगीला बाहेरील बाजूस हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले गेले आहेत.त्यामुळं प्रवासादरम्यान नेमके काय होते याची माहिती मिळणार आहे.नेरळ-माथेरान प्रवास अधिक सुरक्षित आणि आनंददायी व्हावा यासाठी रेल्वे प्रशासन विविध उपायांची चाचणी करीत असून त्यावर मोठ्या प्रमाणावर खर्चही केला जात आहे.नेरळ-माथेरान ही माथेरानची लाईफलाईन समजली जाते..बहुतेक पर्यटक यागाडीतून प्रवास करण्याचा आनंद घेत