माथेरानः माथेरानची राणी अर्थात टॉय ट्रेन नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असते.कधी रेल्वे बंद होते,कधी पटरीवरून उतरते,कधी नवा साज लेऊन डौलात माथेरानचा डोंगर चढत असते तर कधी एसीची हवा खात प्रवाश्यांना थंड हवेच्या ठिकाणी घेऊन जात असते.कधी इंजिन बंद पडतात तरी कधी इंजिन बदलले जातात.माथेरानच्या या राणीची बातमी दर दोन दिवसाला प्रसिध्दी माध्यमात गाजत असते.आजही पुन्हा एकदा माथेरानची राणी चर्चेत आलीय.95 हजार रूपये देऊन ही आख्खी ट्रेन आता बुक करता येणार आहे.दार्जिलिंगच्या धर्तीवर माथेरानच्या ट्रॅेनचा विकास करण्याचा निर्धार मध्य रेल्वेने केला आङे.त्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत.त्याचाच एक भाग म्ङणून फॅमिली पिकनिक किंवा बर्थ डे पार्टीसाठी संपूर्ण माथेराणची राणी बूक करण्याची सोय आता उपलब्ध होत आहे.आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून ही ट्रेन बुक करता येणार आहे.ट्रनला तीन सेंकंड क्लास आणि एक प्रथम श्रेणीचा डबा असून गाडीची आसन क्षमता 100 आहे.राणीला वातानुकूलीत डबा बसविल्यानंतर राणीचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे आता ही ट्रेन 95 हजारात बुक करता येणार आहे.सकाळी ही ट्रेन नेरळ येथून निघेल आणि सायंकाळी परतीचा प्रवास ट्रेनने करता येणार आहे.नेरळ ते माथेरान अशा थेट फेर्‍या सहा होतात.अमन लॉज ते माथेरान शटल सेवेच्या सोळ्या फर्‍या होतात.एसी कोचसाठी प्रवाश्यांना 415 रूपये मोजावे लागतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here