विरोधात बातम्या प्रकाशित करणाऱ्या पत्रकारांना धमकीवजा नोटीसा :
तहसीलदाराचा निषेध
नायगाव बाजार – विरोधात बातम्या प्रकाशीत केल्या म्हणून पत्रकारांना नोटीस बजावून मुस्कटदाबी करणाऱ्या नायगावच्या तहसीलदार सुरेखा नांदे यांचा नरसी येथे झालेल्या पत्रकरांच्या बैठकीत तिव्र शब्दांत निषेध करुन तहसीलदारांच्या विरोधात उग्र आंदोलन करण्याचाही सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
नायगाव तालुक्यातील मेळगाव येथील जप्त रेतीच्या मापात पाप केल्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश बिलोलीचे उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ यांनी दिले. या आदेशाच्या बातम्या नायगाव तालुक्यातील अनेक पत्रकारांनी आपापल्या वर्तमानपत्रातून प्रकाशित केल्या. मात्र प्रकाशित झालेल्या बातम्याने आपले पितळ उघडे पडेल या भितीने तहसीलदार सुरेखा नांदे यांचे पीत्त खवळले व त्यांनी बातमी प्रकाशित केल्या अशा पत्रकारांना धमकीवजा नोटीस बजावून कारवाई करण्याचा इशारा देत मुस्कटदाबी करण्याचा निषेधार्ह प्रकार केल्याने नायगाव तालुक्यातील पत्रकारात असंतोष निर्माण झाला.
नायगाव तालुक्यातील पत्रकारांची एक महत्वपूर्ण बैठक २२ रोजी नरसी येथील शासकीय विश्रामगृहात झाली. या बैठकीत तहसीलदारांनी नोटीस बजावून मुस्कटदाबी करण्याबरोबरच धमकावण्याचा केलेल्या उद्योगाचा तिव्र शब्दात निषेध करण्यात आला. तहसीलदाराच्या विरोधात उग्र आंदोलन करण्याचाही बैठकीत सर्वानूमते निर्णय घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पञकार संघाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर लखपञेवार हे तर व्यासपीठावर जेष्ठ पत्रकार प्रदिप पाटील,जिल्हा पञकार संघाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य गजानन चौधरी, तालुका अध्यक्ष सय्यद जाफर, तालुका उपाध्यक्ष शंकर अडकिणे,प्रकाश हाणमंते,नागेश कल्याण,शेषेराव कंधारे अदी उपस्थित होते. या बैठकीला बालाजी हाणमंते, दिलीप वाघमारे, केरबा रावते, मनोहर मोरे, संदिप कांबळे, भास्कर भेदेकर, अशोक सुर्यवंशी, भगवान शेवाळे, वसंत जाधव, सुभाष पेरकेवार, लक्ष्मण बरगे, चंद्रकांत सुर्यतळ, रामराव ठगे, पवनकुमार पुठ्ठेवाड, प्रसाद काळेवार, माधव धडेकर, वीरेंद्र डोंगरे, रणजित गोणारकर,भीमराव जोधळे, साहेबराव धसाडे, लालसिंग रानडे, अनिल कांबळे, माधव वसंत चव्हाण, दिंगाबर झुबाडे, प्रशांत वाघमारे, प्रकाश माहिफळे, डि. एस. काचमोडे, सय्यद आजीम, गंगाधर गंगगासागरे, माधव बैलकवाड, गंगाधर ठवळे, माधव पवार, राजेश ठवळे, आनंदराव डाकोरे, संभाजी वाघमारे अदिसह तालुक्यातील पञकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ तसेच मराठी पत्रकार परिषदेने याची गंभीर दखल घेतली असून तहसिलदारांच्या अरेरावीचा तीव्र शब्दात धिक्कार केला आहे.