लोकमतच्या जळगाव,खामगाव,नांदेड कार्यालयावर हल्ले

0
1022

जळगाव,नांदेड,खामगावला लोकमतवर हल्ले,
औरंगाबाद,बीडमध्ये तक्रारी दाखल,मिरजेत मोर्चा

लोकमतच्या 29 नोव्हेंबरच्या मंथन रविवार पुरवणीत इसिसचा पैसा या लेखाच्या सोबत ग्राफीन डिझाइनमध्ये वापरल्या गेलेल्या उर्दु भाषेतील शब्दांमुळे एका समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे संतांपलेल्या लोकांनी जळगाव,खामगाव,नांदेड येथील लोकमत कार्यालयावर हल्ले करून मोडतोड केली.जळगावात सेक्युरिटी केबिनची मोडतोड करण्यात आली आहे.बीडमध्ये मुख्य संपादक विजय दर्डा आणि संपादक सुधीर महाजन यांच्याविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.औरंगाबादेत सरफराजखान यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिटीचौक पोलिस स्टेशनमध्ये संपादक,लेख लिहिणारे पवन देशपांडे,आणि चित्रकार प्रकाश सपकाळे यांच्या विरोधात भादवि कलम 153( अ) 295 (अ) 34 कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठिकठिकाणी आज लोकमतच्या अंकाची होळी केली गेली तर मिरज आणि अन्य काही ठिकाणी मोर्चे काढून विरोध केला गेला.त्यामुळे विविध शहरात आज तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.दबादिवसभर सुरू असलेल्या या प्रकारानंतर राज्यातील लोकमतच्या बहुतेक कार्यालयांसमोर पोलिस बंदोबस्त ठेवला गेला होता.दरम्यान घडलेल्या चुकीबद्दल लोकमतने जाहीर माफी मागितली असून अनावधनाने ही चुक झाली असून कुणाच्याही धार्मिक भावना दुखविण्याचा हेतू लोकमतचा नव्हता आणि नसेल असे स्पष्टीकरण लोकमतने दिले आहे.चुक करणार्‍यांवर तातडीने कारवाई कऱण्यात आल्याचेही लोकमततर्फे जाहीर कऱण्यात आले आहे.दरम्यान लोकमतवरील हल्ल्याचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने निषेध केला आहे.दबाव त त्राचा अवलंब करून माध्यमांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न असून अशा प्रकारांना राज्यातील सर्व पत्रकारांनी एकत्र येत विरोध केला पाहिजे असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.मराठी पत्रकार परिषदेनेही लोकमतवर ठिकठिकाणी केल्या गेलेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here