फेक न्यूजचं खापर पत्रकारांच्या माथी फोडण्याची आपल्याकडं पध्दत आहे.यामध्ये अर्थातच भक्तमंडळी आघाडीवर असते.वास्तव नेमकं उलट आहे.फेक न्यूज आणि भक्तमंडळी यांचा काही वेळा घनिष्ठ संबंध आहे.हा आमचा दावा नाही.बीबीसी या विश्‍वासार्ह प्रसार माध्यमाच्या पाहणीतील निष्कर्षातून हे वास्तव समोर आलंय.फेकन्यूजमुळं देशात दंगली झाल्या..जमावाकडून लोकांच्या हत्त्या झाल्या.त्यातून हा विषय ऐरणीवर आला.बीबीसीनं पुढाकार घेत याबाबतची पाहणी केली.केनिया,नायजेरिया आणि भारत या तीन देशातील व्यक्तींचा संख्यात्मक तसेच विविध सामाजिक पातळ्यांनुसार अभ्यास करण्यात आला.या अभ्यासात भारतात जे निष्कर्ष समोर आले ते धक्कादायक आणि सामांन्यांच्या कल्पनांना छेद देणारे आहेत.भारतात फेकन्यूज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजुच्या राजकीय घडामोडी यांच्यात काही वेळा परस्पर संबंध असल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे.

बीबीसीनं बियाँड फेक न्यूज हा प्रकल्प राबविला.खोटया माहितीच्या माहितीच्या विरोधात हा प्रकल्प आहे.या प्रकल्पाचा भाग असलेली कार्यशाळा पुणे विद्यापीठात सोमवारी पार पडली.बीबीसीच्या संशोधनानुसार भारतीय नागरिक हिंसा भडकेल अशा स्वरूपाचे संदेश पाठविण्यास तयार नसतात.मात्र राष्ट्र उभाऱणीच्या दृष्टीनं राष्ट्रवादासंदर्भातल्या बातम्या शेअर करायला तयार असतात.राष्ट्रवादासंदर्भातले संदेश पुढे पाठविणे हे त्यांना आपले कर्तव्य वाटते.भारताची प्रगती,हिंदूशक्ती,हिंदु गतलवैभवाला झळाळी,अशा विषयांबद्दलची प्रसंगी खोटी माहिती देखील सरसकट पुढे पाठविली जाते.

असे संदेश पुढे पाठविणं हे राष्ट्रउभारणीतील आपले योगदान आहे असं अनेकांना वाटतं.असं हे निष्कर्ष सांगतात.बीबीसीला पुढं असंही आढळून आलंय की,डाव्या विचारसरणीचे लोक विस्कळीत पध्दतीनं जोडले गेलेले आहेत.उजव्या विचारसरणीचे लोक एकमेकाशी घट्ट पध्दतीनं बांधले गेलेले असल्यानं उजव्या विचारांशी संबंधित फेकन्यूज डाव्यांपेक्षा अधिक वेगानं पसरतात.

भारतातील 16 हजार ट्टिटर प्रोफाईल,3200 फेसबुक पेजची बीबीसीनं पाहणी केली.त्यातून आधीच्या पिढीच्या तुलनेत सध्याच्या पिढीला राष्ट्रवादी विचारांची ओढ अधिक असल्याचं आढळून आलंय.राष्ट्र उभारणीचा संदर्भ आल्यास संबंधित बातमीची खातर करून घेण्याची काळजी सामांन्य माणूस दाखवत नाही हे देखील अनेकदा दिसून आलंय.( मटाच्या आधारे)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here