बलात्कार केला नसल्याचा खुलासा त्यांनी केला.मात्र या खुलाश्यावर आता पल्लवी गोगोई यांनी पलटवार करताना म्हटले आहे की,ती सहमती नव्हतीच तो बलात्कारच होता.भिती निर्माण करून बळाच्या जोरावर ठेवलेले संबंध सहमतीने संबंध ठेवले असे म्हणता येत नाही..मी अगोदर जे बोलले ते सत्य आहे.मी माझ्या प्रत्येक शब्दावर कायम आहे.मी खरं ते सांगतच राहणार कारण त्यामुळं पिडित महिलांन बळ मिळत राहणार आहे.असंही त्यांनी म्हटलं आहे.गोगोई यांच्या या पलटवारामुळं अकबर अडचणीत आले असले तरी जोपर्यंत त्यांच्या विरोधात पोलीस केस दाखल होत नाही तोपर्यंत अकबर यांच्यावर कोणतीच कारवाई होणार नाही..