पहिला वृत्तपत्र विक्रेता दिन आज महाराष्ट्रात साजरा होत आहे.. डॉ. अब्दुल कलाम यांनी वृत्तपत्र विक्रेता म्हणूनच आपल्या जीवनाची सुरूवात केली होती.. त्यांच्या स्मृती प़ितयथॅ १५ ऑक्टोबर हा दिवस वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा केला जात आहे. मुद्रित माध्यमांचं अस्तित्व बरयाच अंशी वृत्तपत्र विक्रेत्यांवर अवलंबून आहे.. त्यामुळे त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठी पत्रकार परिषद देखील वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा करीत आहे.. या दिनानिमित्त राज्यातील अनेक जिल्हयात परिषदेशी संलग्न जिल्हा संघांनी आज सकाळी वृत्तपत्र विक्रेत्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.