नवी दिल्लीः केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर यांची गच्छंती अटळ आहे.त्यांच्यावर नऊ महिला पत्रकारांनी लैगिक शोषनाचे आरोप केल्यानंतर तेच नव्हे तर भाजप अडचणीत आली.एम.जे अकबर यांच्या विरोधात माध्यमात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.पत्रकारांच्या या मागणीकडं दुर्लक्ष केलं तर सारं माध्यम जगत विरोधात जाईल आणि ते परवडण्यासारखं नाही हे स्पष्ट दिसत असल्याने अकबर यांच्यावर कारवाई होणार हे नक्की झालं आहे.अकबर सध्या नायजेरियाच्या दौर्‍यावर असून त्यांना आज रात्रीपर्यंत परतण्यास सांगितले गेले आहे.
एम.जे.अकबर संपादक असताना महिला त्यानी अनेक महिला पत्रकारांचा लैगिक छळ करीत असत असा आरोप केला जात आहे.सबा नकवी आणि लेखिका गजाला वहाब तसेच अन्य महिला पत्रकारांनी अकबर यांच्यावर आरोप केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here